मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मोठी बातमी! खेडमध्ये घरांवर डोंगर कोसळला; 17 जण ढिगाऱ्याखाली तर रायगडात दरड कोसळून चौघांचा मृत्यू

मोठी बातमी! खेडमध्ये घरांवर डोंगर कोसळला; 17 जण ढिगाऱ्याखाली तर रायगडात दरड कोसळून चौघांचा मृत्यू

Heavy rain washed away Ratnagiri, Raigad: मुसळधार पावसामुळे रत्नागिरी आणि रायगड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Heavy rain washed away Ratnagiri, Raigad: मुसळधार पावसामुळे रत्नागिरी आणि रायगड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Heavy rain washed away Ratnagiri, Raigad: मुसळधार पावसामुळे रत्नागिरी आणि रायगड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

खेड, 23 जुलै: मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील खेड (Khed) आणि चिपळूण (Chiplun) मध्ये महापूर आल्याचं पहायला मिळत आहे. त्यात आता मुसळधार पावसात घरांवर डोंगर कोसळल्याची (mountain fall on houses) धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेडमधील पोसरे बौद्धवाडीत मीठ डोंगर घरांवर कोसळला. या दुर्घटनेमुळे जवळपास 17 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

डोंगर कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 25 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. डोंगर कोसळून झालेल्या या दुर्घटनेमुळे खेडमधील पोसरे गावावर काळाचा घाला.

महाडमध्ये भीषण परिस्थिती; पुरात बुडालेल्या शहराची दाहकता दाखवणारे VIDEO आले समोर

रायगडमध्ये दरड कोसळून चौघांचा मृत्यू

तर तिकडे रायगड जिल्ह्यात दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील साखर सुतार वाडी येथे दरड कोसळून आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजून 5 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तर 4 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या गावांना जोडणारे पितळवाडी- उमरठ फाटा पूल तसेच उमरठ फाटा ते साखर पूल देखील वाहून गेल्यामुळे मदत यंत्रणा पोहोचू शकत नाही.

Ratnagiri Flood: चिपळूणमधील पुराची भीषणता दाखवणारे VIDEO आले समोर, दृश्य पाहून काळजाचा ठोका चुकेल

महाडमध्ये बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी

महाड शहर आणि परिसरातील पूरस्थिती गंभीर बनत चालली असून पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 3 ते 4 हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्यावेत अशी विनंतीवजा मागणी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे केली आहे. संपूर्ण महाड शहराला पुराचा वेढा बसला आहे. आजूबाजूची गावेदेखील पाण्याखाली आहेत. मुंबई गोवा महामार्गावर पाणी असल्याने एनडीआरएफचे पथक अडकून पडले असून ते महाडमध्ये पोहोचू शकत नाही. पाऊसही जास्त आहे. अशावेळी बचाव कार्यात अडथळे येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन नौदल, तटरक्षक दल यांची हेलिकॉप्टर बचावासाठी उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी जिल्हाधिकारी यांनी केली आहे.

First published:

Tags: Chiplun, Khed, Maharashtra, Raigad, Ratnagiri