• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • महाडमध्ये भीषण परिस्थिती; पुरात बुडालेल्या शहराची दाहकता दाखवणारे VIDEO आले समोर

महाडमध्ये भीषण परिस्थिती; पुरात बुडालेल्या शहराची दाहकता दाखवणारे VIDEO आले समोर

महाडमध्ये झालेल्या मुसळधार पावसाची दाहकता दाखवणारे व्हिडीओ आता समोर आले आहेत.

  • Share this:
महाड, 23 जुलै: गेल्या दोन दिवसांत रायगड (Heavy rain in Raigad) आणि रत्नागिरीत (Ratnagiri) झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. चक्क 10 ते 15 फूट रस्त्यांवर आणि वस्त्यांत पाणी शिरल्याचं पहायला मिळालं. रायगड जिल्ह्यातील महाड (Mahad) तालुक्यातील सावित्री नदीला (Savitri River) ढगफूटी सदृश्य अतीमुसळधार पावसाने, महापूर (Flood) परीस्थिती निर्माण केलीय. सावित्री नदीला आलेल्या महापूरामुळे महाड शहर पुर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने आता पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. महाड शहरात निर्माण झालेल्या पुराची भीषणता आणि दाहकता दाखवणारे आता व्हिडीओ समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये आपल्याला दिसत आहे की, अनेक गाड्या या अद्यापही पाण्याखाली अडकून पडलेल्या आहेत. तर काही गाड्या चार ते पाच फूटांवर अडकून पडलेल्या आहेत. ही दृश्य पाहून आपण कल्पना करुन शकतो की, पाण्याचा प्रवाह किती वेगाने असेल आणि पूरस्थिती किती गंभीर होती. साताऱ्यातील वाई आणि पाटणमध्ये घरांवर दरड कोसळली, 7 ते 8 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती महाड शहारातील दहा हजारहून अधीक नागरिक महापुराच्या पाण्याने वेढले गेलेत. वीज पूरवठा आणि मोबाईल संपर्क खंडीत झालांय. त्यामुळे नागरीक भयभीत झालेत. या भयभीत झालेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी NDRF आणि SDRF ने रेस्क्यू आँपरेशन पहाटे पासून सुरू केलंय. महाड शहराच्या उत्तरेला सावित्री नदीच्या महापूराचे पाणी तब्बल 10 किलोमीटर पर्यंत पसरलेय. त्यामुळे महापूराच्या तडाख्यात सापडलेल्या गावांनाही महापूराची मगरमीठी बसलीय. सावित्री नदीच्या उत्तरेला NDRF च्या जवानांनी रेस्क्यू आँपरेशन सुरू केलंय महाडमध्ये बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी महाड शहर आणि परिसरातील पूरस्थिती गंभीर बनत चालली असून पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 3 ते 4 हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्यावेत अशी विनंतीवजा मागणी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे केली आहे. संपूर्ण महाड शहराला पुराचा वेढा बसला आहे. आजूबाजूची गावेदेखील पाण्याखाली आहेत. मुंबई गोवा महामार्गावर पाणी असल्याने एनडीआरएफचे पथक अडकून पडले असून ते महाडमध्ये पोहोचू शकत नाही. पाऊसही जास्त आहे. अशावेळी बचाव कार्यात अडथळे येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन नौदल, तटरक्षक दल यांची हेलिकॉप्टर बचावासाठी उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी जिल्हाधिकारी यांनी केली आहे.
Published by:Sunil Desale
First published: