Home /News /maharashtra /

गाडी बाजूला घे म्हणून सांगितले अन् पाठलाग करून केले कोयत्याने वार, रत्नागिरीत पर्यटकांवर हल्ला

गाडी बाजूला घे म्हणून सांगितले अन् पाठलाग करून केले कोयत्याने वार, रत्नागिरीत पर्यटकांवर हल्ला

पिंपरी चिंचवड येथील पाच पर्यटक हर्णॆ समुद्र किनाऱ्यावरील समुद्र संकेत या हॉटेलमध्ये थांबले होते.

पिंपरी चिंचवड येथील पाच पर्यटक हर्णॆ समुद्र किनाऱ्यावरील समुद्र संकेत या हॉटेलमध्ये थांबले होते.

पिंपरी चिंचवड येथील पाच पर्यटक हर्णॆ समुद्र किनाऱ्यावरील समुद्र संकेत या हॉटेलमध्ये थांबले होते.

दापोली, 15 मे - रत्नागिरी (ratangiri) जिल्ह्यातील हर्णे समुद्र किनाऱ्यावर गाडी पार्क करण्याच्या वादावारून पुण्यातील (pune) दोन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून दोन्ही तरुण थोडक्यात बचावले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै समुद्र किनाऱ्याच्या रस्त्यावर ही घटना रविवारी सायंकाळी घडली. भुभम परदेशी (वय २९), सूरज काळे (वय २५) अशी हल्ला झालेल्या जखमी तरुणांची नाव आहे. हे दोन्ही तरुण पिंपरी चिंचवड येथील राहणारे आहे. पिंपरी चिंचवड येथील पाच पर्यटक हर्ण समुद्र किनाऱ्यावरील समुद्र संकेत या हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र आज ते पुण्याकडे जायला निघाले होते. त्याचवेळी सुराली गार्डन जवळ एक ईनोव्हा गाडी रस्त्यावर लावण्यात आल्याने गाडी बाजूला करं, असे सांगितले. आपल्याला गाडीला बाजूला कर असे सांगितल्याचा राग राग मनात धरून पाठलाग करत टोळक्याने कोयत्याने हल्ला चढवला. (परभणीत लग्नाच्या जेवणातून विषबाधा, 100 पेक्षा जास्त नागरीक रुग्णालयात दाखल) शुभम परदेशी, सूरज काळे या हल्लयात जखमी झाले आहेत. त्यांच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आला. तसंच गाडीची काचही फोडण्यात आली. या घटनेनंतर दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या दोन्ही पर्यटकांवर खुनी हल्ला करणारे सातारा जिल्ह्यातील असल्याचे समजले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहे. जळगावात तरुणावर केले होते कोयत्याने वार, अखेर हल्लेखोर अटकेत दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अशीच एक घटना घडली होती. जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. रोहीत भिकन मराठे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. दसऱ्याच्या दिवशी सुनिल राठोड आणि गौरव चौधरी यांच्यात भांडण झाले असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होवून कारवाई झाली होती. दोन महिन्यापूर्वी ११ मार्च रोजी सुनिल हा लॉन्ड्रीवर कपडे घेण्यासाठी गेला असता त्यावेळी सोनू चौधरी, गौरव चौधरी, रोहित भिकन मराठे हे हातात कोयता घेवून त्यांच्या घराजवळ फिरुन राठोड यांना खून्नस देत होते. यावेळी मागून येवून सोनू गोपाल चौधरी, रोहित भिकन मराठे हे हातात कोयता घेवून येत त्याने सुनिल याच्या डोक्यावर वार करीत त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी रोहित मराठे याला कासमवाडी परिसरातून अटक केली.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या