जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'हर हर महादेव'चा वाद चिघळला; टीव्हीवर सिनेमा दाखवूच नका, स्वराज्य संघटना आक्रमक

'हर हर महादेव'चा वाद चिघळला; टीव्हीवर सिनेमा दाखवूच नका, स्वराज्य संघटना आक्रमक

'हर हर महादेव'चा वाद चिघळला; टीव्हीवर सिनेमा दाखवूच नका, स्वराज्य संघटना आक्रमक

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासूनच हा चित्रपट वादात सापडला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 डिसेंबर:  ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासूनच हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटातील काही प्रसंगावर संभाजी ब्रिगेडकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर आता हा चित्रपट 18 डिसेंबरला टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे. यावरून पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेड आणि स्वराज्य संघटनेकडून झी मराठी वाहिनीला इशारा देण्यात आला आहे. ‘हरहर महादेव’ हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करू नये. चित्रपट चॅनवर दाखवल्यास स्टुडीओ फोडणार असल्याचा इशारा स्वराज्य संघटनेकडून देण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेड आक्रमक   दरम्यान दुसरीकडे याच मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाली आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटातील वादग्रस्त प्रसंग वगळून चित्रपट प्रदर्शित करावा. जर 18 डिसेंबर रोजी वाहिनीने चित्रपट प्रदर्शित केल्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने झी स्टुडिओ आणि सर्व कलाकारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा संभांजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे. दरम्यान संभाजीराजे यांनी देखील हा चित्रपट इतक्या लवकर टीव्हीवर येतो कसा? म्हणत हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल अंस म्हटलं होतं.

जाहिरात

नेमकं काय म्हटलं संभाजीराजे यांनी? संभाजीराजे यांनी देखील या चित्रपटाच्या टीव्हीवरील प्रसारणास विरोध केला आहे. ‘इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल’ असं ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात