सोलापूर, 13 ऑगस्ट : मंत्रिमंडळ स्थापन करता येत नाही, मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरही खातेवाटप करता येत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे (cm eknath shinde) गोंधळलेले आहेत. फडणवीस हे मुख्यमंत्री असते तर परिस्थिती वेगळी असती त्यामुळे शिंदेंसोबत राज्यातील नेते कार्यकर्ते कितपत जातील याबाबत थोडी शंका वाटतेय, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी केली. शिंदे सरकारचा कसाबसा विस्तार झाला पण 4 दिवस उलटले तरीही खातेवाटप होण्याचे नाव घेत नाही. याच मुद्यावरून जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला पण अजूनही खातेवाटप होत नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे गोंधळलेले आहेत. त्यांच्यासोबत राज्यातील नेते कार्यकर्ते कितपत जातील याबाबत थोडी शंका वाटते. देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आहे. त्यांचा अभ्यास आणि अनुभव चांगला आहे, त्यांना आता शिंदेंच्या हाताखाली काम करावे लागत आहे. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर परिस्थिती वेगळी असती. मात्र भाजप नेतृत्वाने असा निर्णय कसा काय केला हे माहिती नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केला. ‘एकनाथ शिंदे हाताखाली सरकार स्थिर व्हावे, आम्हीही त्यांच्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे त्यांनी आता कामाला लागले पाहिजे, पूजा आर्चा करणे, मंदिरांना भेटी देण्यात जास्त वेळ जात आहे, त्यामुळे पूजाअर्चा करण्यासाठी वेगळा मंत्री नेमला पाहिजे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. ( वसंतदादा पाटील यांच्या नातीचं निधन, मधु पाटील यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास ) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते शिवसेनेकडे गेले कारण त्यांचे सदस्य जास्त आहेत. विरोधी पक्षनेतेपदावर आम्ही दावा करणार होतो पण शिवसेनेने दावा केला. कारण त्यांची संख्या जास्त आहे. साहजिक आहे की त्यांनी विरोधीपक्षनेतेपदावर दावा केला, असंही जयंत पाटील म्हणाले. ( राष्ट्रध्वज फाटल्यास किंवा जुना झाल्यास काय करावं? कागदी झेंड्यासाठी नियम काय? ) भाजपच्या विरोधात कोणी गेल्यावर त्याच्यावर टीका करतात आणि नंतर त्यांचे उदात्तीकरण करण्याची सवय आहे त्यामुळे संजय राठोड यांच्याबाबतीत तेच झाले असावे. तुम्ही असे म्हणा आम्ही असे बोलतो असेच भाजपचे काम आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.