जळगाव, 17 सप्टेंबर : शिवसेनेतील 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर मागच्या दोन महिन्यांपासून बंडखोर आमदार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये खटके उडताना दिसत आहे. (Gulabrao Patil vs Ajit Pawar) दरम्यान एकेकाळी शिवसेनेचे कट्टर असलेले गुलाबराव पाटील यांच्यावर काल (दि.17) विरोधी पक्षनेते अजीत पवारांनी चांगलीच टीकेची झोड उठवली. दरम्यान यावर गुलाबराव पाटील यांनीही पलटवार केला आहे. जळगावमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे.
यावर गुलाबराव पाटील म्हणाले कि, अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहेत. टीका करणं त्यांचं काम आहे. पण अजित पवार यांनीही सकाळचा शपथविधी केला होता. मग आम्ही पण त्यांना गद्दार म्हणायचं का, असा खोचक सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली, साडेतीनशे कोटी रुपये जळगाव जिल्ह्यासाठी मिळाले हे पण त्यांनी मान्य करायला पाहिजे. मात्र त्यांनी आम्हाला गद्दार म्हटले आहे, ते आम्हाला मान्य आहे असे गुलाबराव पाटील म्हणाले. पण अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहे, सरकारच्या चांगल्या व वाईट अशा दोन्ही गोष्टी सांगण्याची जबाबदारी त्यांची होती.
माझ्या मागे दोन गुलाबराव लागलेत
महाविकास आघाडीचे प्रॉपर उमेदवारच ठरच नाहीये, प्रॉपर मतदारसंघ ठरलेला नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुकीमध्ये अजून त्यांची युती पक्की झालेली नाही तर आमदारकीच्या निवडणुकीत कोण? आगामी विधानसभेत तीनही पक्ष महाविकास आघाडी लढवतील असे आपणास वाटत नसल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.
'माझ्या विरोधात दोन गुलाबराव फिरत असून दोन्ही आतापासूनच आमदार झालेले आहेत. मात्र ही जागा कुणाला मिळेल ? पुढे काय समीकरण राहील ? याचा विचार कुणी केलेला नाही. यामुळे दोन्ही गुलाबरावांनी आधी नवरदेव कोण ? हे ठरविले पाहिजे !'' असा खोचक सल्ला आज पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिला.
हे ही वाचा : विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार; एकनाथ खडसेंचा शिंदे गटाच्या आमदारावर गंभीर आरोप
अजीत पवारांनी ते मान्य करायला पाहिजे
या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली, साडेतीनशे कोटी रुपये जळगाव जिल्ह्यासाठी मिळाले हे पण त्यांनी मान्य करायला पाहिजे. मात्र त्यांनी आम्हाला गद्दार म्हटले आहे, ते आम्हाला मान्य आहे, पण अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहे, सरकारच्या चांगल्या व वाईट अशा दोन्ही गोष्टी सांगण्याची जबाबदारी त्यांची होती. त्यांनी फक्त त्यांनी फक्त सरकारवर टीका केली, सरकारच्या चांगल्या कामाबद्दल अजित पवार यांनी ऊहापोह त्यांनी केला नाही, असे यावेळी मंत्री पाटील म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Gulabrao patil, Jalgaon