मराठी बातम्या /बातम्या /देश /

वराचं वागणं वधूला खटकलं; ऐनवेळी नकार दिल्यानं नवरदेवाला लग्नाविनाच माघारी परतावं लागलं

वराचं वागणं वधूला खटकलं; ऐनवेळी नकार दिल्यानं नवरदेवाला लग्नाविनाच माघारी परतावं लागलं

लग्नात डीजे समोर डान्स करताना नवऱ्याकडील वऱ्हाडींनी गैरवर्तन केल्यानं नवरीनं थेट लग्नाला नकार दिल्याची घटना समोर आली आहे. यामुळे विवाहस्थळी बराच गोंधळ उडाला होता.

  • Published by:  News18 Desk

बरेली, 25 एप्रिल: लग्नात डीजे समोर डान्स करताना नवऱ्याकडील वऱ्हाडींनी गैरवर्तन केल्यानं नवरीनं थेट लग्नाला नकार दिल्याची घटना समोर आली आहे. यामुळे विवाहस्थळी बराच गोंधळ उडाला होता. झालेल्या गैरवर्तनानंतर अनेकांनी नवरीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण नवरीने लग्नाला स्पष्टपणे नकार दिला. यामुळे नवऱ्याकडील मंडळींना आल्या पावली माघारी परत जावं लागलं आहे. हे प्रकरण केवळ एवढ्यावरचं थांबलं नाही, तर गैरवर्तन प्रकरणी वधूच्या वडिलांनी आता थेट पोलिसांत तक्रार दाखल केली असून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

संबंधित घटना उत्तर प्रदेशातील शेरगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिया नगला याठिकाणी घडली आहे. याठिकाणी लग्नाची सर्व तयारी झाली होती. दोन्ही पक्षांत आनंदाच वातावरण होतं. वधूच्या घरासमोर डीजे वाजत होता. दरम्यान नवरदेवाचा चुलत भाऊ आपल्या काही मित्रांसोबत दारू पिऊन डीजेसमोर डान्स करत होता. यावेळी त्यांनी दारुच्या नशेत काही लहान मुलांना धक्का देऊन खाली पाडलं. यामुळे लहान मुलांना दुखापतीही झाल्या. दरम्यान गोंधळ उडाल्याने नवरीची आई आणि नवरीचा छोटा भाऊ डीजेच्या ठिकाणी गोंधळ करणाऱ्या वऱ्हाडींना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले.

यावेळी नवऱ्याच्या नातेवाईकांनी नवरीच्या आईला आणि भावाला धक्का देऊन खाली पाडलं. तरीही वधू पक्षाकडील लोकांनी वऱ्हाडींना समजावण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही ऐकायला तयार झालं नाही. दरम्यान डीजेजवळ सुरू असलेला गोंधळ पाहून नवरदेवही घटनास्थळी आला. यावेळी त्याने वऱ्हाडी मंडळींची समजूत काढण्याऐवजी वधू पक्षातील नातेवाईंवरच ओरडू लागला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर त्यांने वधू पक्षातील लोकांना मारण्याची धमकीही दिली. यामुळे प्रकरण मिटण्याऐवजी वाढतचं गेलं.

हे ही वाचा-उपचारादरम्यान पोलीस अधिकाऱ्याच्या आईचा मृत्यू; डॉक्टरांना लोखंडी रॉडनं मारहाण

नवरदेवाकडील पाहुण्यांचं गैरवर्तन पाहून नवरीने थेट लग्नाला नकार दिला. यानंतर लग्नासाठी आलेल्या सर्व मंडळींनी नवरीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने काहीही ऐकलं नाही. यावेळी नवरीनं म्हटलं की, जो मुलगा मोठ्या लोकांचा सन्मान करत नाही, अशा मुलासोबत मी कधीच लग्न करू शकत नाही. यानंतर नवऱ्याकडील मंडळींना नवरीला न घेताच परत जावं लागलं आहे.

First published:

Tags: Marriage, Uttar pradesh