जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नवरदेवाचे कळाले नको 'ते' उद्योग, हळदीच्या दिवशी निघाली पोलीस स्टेशनात वरात!

नवरदेवाचे कळाले नको 'ते' उद्योग, हळदीच्या दिवशी निघाली पोलीस स्टेशनात वरात!

लग्नाला अवघे काही तास बाकी असताना नवरदेवाचे दुसऱ्या महिलेसोबतचे अनैतिक संबंध उघडकीस आल्याने नवरदेवाची पंचाईत झाली.

लग्नाला अवघे काही तास बाकी असताना नवरदेवाचे दुसऱ्या महिलेसोबतचे अनैतिक संबंध उघडकीस आल्याने नवरदेवाची पंचाईत झाली.

लग्नाला अवघे काही तास बाकी असताना नवरदेवाचे दुसऱ्या महिलेसोबतचे अनैतिक संबंध उघडकीस आल्याने नवरदेवाची पंचाईत झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 03 मे : ‘चोर तर चोर आणि वर शिरजोर’ असाच प्रकार बुलडाण्यात समोर आला आहे. लग्नाला अवघे काही तास बाकी असताना नवरदेवाचे दुसऱ्या महिलेसोबतचे अनैतिक संबंध उघडकीस आल्याने नवरदेवाची (groom) पंचाईत झाली. आपली पोलखोल झाली असतानाही उलट नवरीच्या घरी जाऊन मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या नवरीकडच्या मंडळीने नवरदेवाला जेलची हवा खाऊ घातली. बुलडाणा (buldhana) जिल्ह्यातील मलकापूर येथील वृंदावन नगरमध्ये ही घटना घडली.  वृंदावन नगरमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय मुलीचा विवाह बोरखेडी येथील अमोल गणेश पालकर यांच्याशी होणार होता. लग्न ठरलं असल्यामुळे दोन्हीकडील मंडळी जोरदार कामाला लागली होती. हळदीच्या दिवशी मात्र अचानक भलताच प्रकार घडला. अमोल पालकरचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती नवरीकडच्या मंडळीला कळाली.  लग्ना अगोदरच अमोलचे बिंग फुटल्याने एकच खळबळ उडाली. संतापलेल्या नवरीने अमोलला थेट याबद्दल जाब विचारला आणि चांगलेच फैलावर घेतले. लग्न आता दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना दुसऱ्याच महिलेसोबत अनैतिक संबंध कसे होते, तरी लग्न का करतोय, असा सवालच नवरीने उपस्थितीत केला. पण, उलट नवरीने आपल्याला प्रश्नविचारल्यामुळे संतापलेल्या अमोलने नवरीच्या घरी जाऊन धिंगाणा घातला.  अमोलने चक्क तिच्या घरी जाऊन मारहाण करीत मला तुझ्याशी लग्न करायचे असून माझे दुसऱ्या महिले सोबत संबंध असल्याची कबुली दिली. त्यामुळे नवरीकडची मंडळी आणखी संतापली. मुलींच्या आईने नवरदेव व त्याच्या नातेवाईकांविरोधात मलकापूर शहर पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून  पोलिसांनी 11 जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून नवरदेव बोहल्यावर चढण्याच्या एक दिवस अगोदरच हळद लागलेली असतांना त्याला जेलची हवा खावी लागली. या प्रकरणाच अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात