मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /विजय ही राष्ट्रवादीचा आणि पराभव सुद्धा राष्ट्रवादीचाच, साताऱ्यातील लढतीचा निकाल

विजय ही राष्ट्रवादीचा आणि पराभव सुद्धा राष्ट्रवादीचाच, साताऱ्यातील लढतीचा निकाल

दोन्ही वाॅर्डातून आमदार मकरंद पाटील यांचे समर्थकच निवडणूक लढवत असल्याने या गावातील मतदारही संभ्रमात होते.

दोन्ही वाॅर्डातून आमदार मकरंद पाटील यांचे समर्थकच निवडणूक लढवत असल्याने या गावातील मतदारही संभ्रमात होते.

दोन्ही वाॅर्डातून आमदार मकरंद पाटील यांचे समर्थकच निवडणूक लढवत असल्याने या गावातील मतदारही संभ्रमात होते.

वाई, 18 जानेवारी : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत  (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021) भाजप (BJP) विरुद्ध महाविकास आघाडी (MVA Goverment) चित्र असताना सातारा (Satara) जिल्ह्यात मात्र वाई तालुक्यातील अभेपुरी गावात राष्ट्रवादी (NCP) काॅंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेस अशी लढत होती. त्यामुळे या गावात विजय ही राष्ट्रवादीचा आणि पराभव ही राष्ट्रवादीचा काॅंग्रेसचाच झाला आहे.

अभेपुरी गावात हनुमान वाॅर्ड आणि भैरवनाथ वाॅर्ड असे दोन वाॅर्डमधून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांचे समर्थक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते. दोन्ही वाॅर्डातून आमदार मकरंद पाटील यांचे समर्थकच निवडणूक लढवत असल्याने या गावातील मतदारही संभ्रमात होते. विशेष म्हणजे, अभेपुरी गावात यंदा शांततेत प्रचार आणि मतदान पार पडले. त्यामुळे या अभेपुरी गावात निकाल नक्की काय लागेल याकडे संपुर्ण सातारा जिल्हयाचे लक्ष लागून होते.

आज निकाल लागला आणि विजय हा राष्ट्रवादीचा आणि पराभव सुद्धा राष्ट्रवादीचा काॅंग्रेसचाच झाला आहे. अभेपुरी गावातून हनुमान वाॅर्डमधून आप्पा व्यंकट मांढरे, विकास मांढरे, सचिन दळवी, अनिल पवार तर भैरवनाथ वाॅर्ड मधून विजय बाळासो मांढरे, यशवंत महादेव मांढरे, हेमा अनिल पवार आणि इंदुबाई धैर्यसिंग दळवी हे उमेदवार उभे होते. आज निकाल लागला त्यात हनुमान वॉर्डमधून पहिल्या जागेसाठी आप्पा व्यंकट मांढरे 252 मतांनी विजयी झाले तर त्यांच्या समोर उभे असलेले विकास मांढरे यांचा पराभव झाला असून त्यांना 220 मते मिळाली. तर पहिल्या जागेसाठी 4 मतदारांनी नोटा म्हणजे यापैकी कोणीही नाही असं मतदान केले आहे.

याच हनुमान वाॅर्ड मधून दुसऱ्या जागेकरता निवडणूक लढवत असलेल्या सचिन दळवी यांचा 236 मते पडून विजय मिळवला. तर सचिन दळवी यांनी अनिल पवार यांचा पराभव केला असून सचिन दळवी यांना २२७ मते पडली. तर 13मतदारांनी नोटाचा वापर केला.

तर, भैरवनाथ वॉर्डमधून विजय बाळासो मांढरे यांना सर्वांधिक 265 मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला. त्यांनी यशवंत महादेव मांढरे यांचा पराभव केला असून यशवंत महादेव मांढरे यांना 168 मते मिळाली. या भैरवनाथ वाॅर्डातून दुसऱ्या जागेसाठी हेमा अनिल पवार या निवडणूक लढवत होत्या. त्यांनी इंदुबाई धैर्यसिंग दळवी यांचा पराभव केला असून हेमा अनिल पवार यांना 255 मते मिळाली तर इंदुबाई धैर्यसिंग दळवी  यांना १७८ मते मिळाली. या भैरवनाथ वाॅर्डात एकाही मतदाराने नोटा मतदान केलं नाही.

First published:

Tags: Gram panchayat, राष्ट्रवादी, सातारा