मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोकणात नारायण राणेंचं अस्तित्व कधीच संपलंय, शिवसेना आमदारांचा जोरदार 'प्रहार'

कोकणात नारायण राणेंचं अस्तित्व कधीच संपलंय, शिवसेना आमदारांचा जोरदार 'प्रहार'

कोकणात नारायण राणे यांचं अस्तित्व कधीच संपलं आहे. राणेंबद्दल बोलण्यात मला काहीच स्वारस्य नाही. कारण ते तोंड उघडल्यावर फक्त घाणच बाहेर पडते.

कोकणात नारायण राणे यांचं अस्तित्व कधीच संपलं आहे. राणेंबद्दल बोलण्यात मला काहीच स्वारस्य नाही. कारण ते तोंड उघडल्यावर फक्त घाणच बाहेर पडते.

कोकणात नारायण राणे यांचं अस्तित्व कधीच संपलं आहे. राणेंबद्दल बोलण्यात मला काहीच स्वारस्य नाही. कारण ते तोंड उघडल्यावर फक्त घाणच बाहेर पडते.

नाशिक, 18 जानेवारी: महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021) मतमोजणी सुरू आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर कोकणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना शिवसेनेनं सातवे आस्मान दाखवले आहे. सोनाळी ग्रामपंचायतीवर सेनेनं भगवा फडकावला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजपवर जोरदार टीकेची तोफ डागली आहे.

नाशिक येथे पत्रकारांना संबोधित करताना आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार प्रहार केला.

हेही वाचा...जळगाव जिल्ह्यात 'या' ग्रामपंचायतीत तृतीयपंथी उमेदवारानं खेचून आणली विजयश्री

कोकणात नारायण राणे यांचं अस्तित्व कधीच संपलं आहे. राणेंबद्दल बोलण्यात मला काहीच स्वारस्य नाही. कारण ते तोंड उघडल्यावर फक्त घाणच बाहेर पडते. शिवसेनेला ग्रामीण भागात जनाधार आहे. भाजप संस्कृती विसरून बेछूट आरोप करत आहे. मात्र, हे चुकीचं आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा बेशरमपणा, असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते करताय हे अयोग्य असल्याचं आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं.

कोकणात भाजप नावाला शिल्लक नाही...

आमदार जाधव म्हणाले, कोकणात भाजप नावाला शिल्लक नाही. भाजपला एकाही गावात यश मिळालं नाही. जनतेनं नाकारलेल्या भाजपनं मुसंडी मारता आली नाही. राज्यात प्रत्येक ठिकाणी फक्त महाविकास आघाडीला निर्विवाद यश मिळताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. म्हणून त्याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला आहे. महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांची एकता असल्याचा हा फायदा आहे. निवडणुका जवळ आली की एकत्रित होण्याचा विचार महाविकास आघाडी करेल, असंही आमदार जाधव यांनी सांगितलं. औरंगाबाद नामांतर हा फक्त शिवसेनेचा विषय नाही. त्यावर चर्चा सुरू आहे.

हेही वाचा...मुंबई जवळच्या ग्रामपंचायतीमध्येच शिवसेनेला मोठा धक्का

धनंजय मुंडेंच्या 'त्या' प्रकरणावर काय म्हणाले?

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला आहे. मात्र, आता त्या विषयावर पडदा पडला आहे. 1997 साली शरीर संबंध केल्याचा रेणू शर्मा यांनी आरोप केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याचा साक्षात्कार रेणू शर्मा यांना तब्बव 23 वर्षानंतर का झाला? याचं आपण समर्थन करत नाही. मात्र, समाजप्रबोधन व्हायला हवं, असं मत यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले आहे.

First published: