मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राज्यपालांनी मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करू नये, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नवाब मलिकांची टीका

राज्यपालांनी मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करू नये, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नवाब मलिकांची टीका

 राज्यपालांनीं (Governor) स्वतःला मुख्यमंत्री (Chief Minister) न समजता घटनेच्या चौकशीत राहून काम करावे, असं मत मंत्रिमंडळ बैठकीत (State Cabinet) व्यक्त झाल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक  (Nawab Malik) यांनी दिली.

राज्यपालांनीं (Governor) स्वतःला मुख्यमंत्री (Chief Minister) न समजता घटनेच्या चौकशीत राहून काम करावे, असं मत मंत्रिमंडळ बैठकीत (State Cabinet) व्यक्त झाल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली.

राज्यपालांनीं (Governor) स्वतःला मुख्यमंत्री (Chief Minister) न समजता घटनेच्या चौकशीत राहून काम करावे, असं मत मंत्रिमंडळ बैठकीत (State Cabinet) व्यक्त झाल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली.

मुंबई, 3 ऑगस्ट : राज्यपालांनीं (Governor) स्वतःला मुख्यमंत्री (Chief Minister) न समजता घटनेच्या चौकशीत राहून काम करावे, असं मत मंत्रिमंडळ बैठकीत (State Cabinet) व्यक्त झाल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक  (Nawab Malik) यांनी दिली. राज्यपाल हे घटनात्मकरित्या राज्याचे प्रमुख असले, तरी त्यांनी विधानसभेच्या अधिकारांवर वरचढ न होता काम करावे, अशी विनंती राज्यपालांना करत असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

काय आहे वाद

राज्यपालांनी नांदेड, हिंगोली आणि परभणीचा दौरा आयोजित केला आहे. त्यावेळी नांदेडमध्ये अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं उभारलेल्या हॉस्टेलचं उद्घाटन करणार आहेत. राज्यातील अल्पसंख्याक विभागाला कुठलीही कल्पना न देता राज्यपालांनी हे कार्यक्रम आयोजित कऱणं म्हणजे राज्यात दोन सत्ताकेंद्रं उभारण्याचा प्रकार असल्याचा आक्षेप मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्यपालांनी नांदेडमधील विद्यापीठाच्या कार्यक्रमाला जायला काही आक्षेप नाही, मात्र हिंगोली, नांदेड आणि परभणीत जिल्हाधिकाऱी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ते घेणार असलेली बैठक आक्षेपार्ह असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय. राज्याचे मुख्य सचिव मंत्रिमंडळ बैठकीतील माहिती राज्यपालांपर्यंत पोहोचवणार असल्याचं

तुम्ही मुख्यमंत्री नाही

महामहिम राज्यपाल हे पूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मात्र अजूनही त्यांना आपण मुख्यमंत्रीच आहोत, असं वाटत असल्याची टीका मलिक यांनी केली. मात्र आपण मुख्यमंत्री नाही, तर राज्यपाल आहोत, हे कोश्यारींनी लक्षात ठेवावं, अशी राज्य मंत्रिमंडळाची अपेक्षा असल्याचं मलिक यांनी सांगितलं. राज्य सरकारकडून राज्यपालांना हा दौरा रद्द करण्याची विनंती करणार असल्यी माहितीही मलिक यांनी दिली आहे. आपण डोंगर चढतो, दऱ्या उतरतो, अशा मुख्यमंत्रीपदाच्या आठवणी तो सांगत असले, तरी सध्या ते महामहिम राज्यपाल आहेत, हे विसरू नये, असा टोलाही त्यांनी राज्यपालांना लगावला.

हे वाचा -मोदी सरकारला घेरण्यासाठी राहुल गांधींची चाय पे चर्चा; विरोधी पक्षाचे नेते एकवटले

12 आमदारांच्या मुद्द्यावरून टीका

राज्यपालनियुक्त 12 आमदारांची राज्य सरकारनं निश्चित केलेली यादी राज्यपाल रद्द करू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली. राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा ठेवावी आणि सरकारचे प्रमुख म्हणून आपला कारभार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे भारतातच असून लवकरच ते निर्दोष सिद्ध होतील,असा विश्वास वाटत असल्याचं मलिक म्हणाले. तर आंचल गोयल हेच परभणीचे जिल्हाधिकारी असतील आणि ते तातडीनं परभणीच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी घेतील, असं ते म्हणाले.

First published:

Tags: Governor bhagat singh, Nawab malik, State goverment