जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वादग्रस्त विधानानंतर राज्यपाल दिल्लीत, भाजपच्या वरिष्ठांकडून कोश्यारींची कानउघाडणी?

वादग्रस्त विधानानंतर राज्यपाल दिल्लीत, भाजपच्या वरिष्ठांकडून कोश्यारींची कानउघाडणी?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्ली दौऱ्यावर

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्ली दौऱ्यावर

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्ली दौऱ्यावर जात आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. राज्यपालांविरोधात राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. तर शिंदे गट, ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेसनेही राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला. भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपालपदावरून काढा, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली. या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. 24 आणि 25 नोव्हेंबर अशा दोन दिवशी राज्यपाल दिल्लीत असतील. उत्तर भारतामध्ये राज्यपाल कोश्यारी यांचे नियोजित कार्यक्रम आहेत. वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जात आहेत, त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते राज्यपालांची कानउघाडणी करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

इतिहासामुळे वादात सापडलेल्या भगतसिंग कोश्यारींचा इतिहास, अशी झाली राजकारणात एण्ट्री! काय म्हणाले राज्यपाल? ‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली. ’…तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करावा’; अजित पवारांनी सुनावलं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात