सोलापूर, 6 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आणखी वादग्रस्त टीका केली आहे.
'जितेंद्र आव्हाड वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, हिंदू देव-देवतांविषयी आक्षेपार्ह विधानं करत आहेत. कदाचित शरद पवार जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून हे सगळं बोलत असतील, असं मला वाटतंय', असा आरोप पडळकर यांनी केला आहे.
'छत्रपती शिवाजी महाराज नसते तर ते जितुद्दीन झाले असते. महाराज नसते तर अजितचा अझरुद्दीन झाला असता. शरदचा शमसुद्दीन झाला असता. रोहितचा रझाक झाला असता. मताच्या राजकारणासाठी घाणेरडं स्टेटमेंट करणं, घाणेरडं राजकारण करणं ही पवारांची गेल्या 50 वर्षांमधली कुटनिती आहे', अशी वादग्रस्त टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
मी जे बोललो त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण आहे .. बहुजनांना बदनाम करण्याची जुनीच पद्धत आहे .. जे सत्य आहे ते लोकान समोर मांडले … तुम्ही बदनामी करा बहुजन महापुरुषांची आम्ही देऊ उत्तर ,.. बहुजन इतिहास का डोळ्यात सलतो ..#करारा_जवाब _मिलेगा#जयशिवराय _जयभीमराय pic.twitter.com/0U5kBVnzVE
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 6, 2023
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
'मोघलांचा इतिहास पुस्तकातून काढणार असं तावडेंनी विधानसभेत जाहीर केलं. पण समोर औरंगजेब ठेवलाय म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. त्याच्यातून ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना,' असं आव्हाड म्हणाले होते.
जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानावर भाजप आक्रमक झाली, तसंच भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलनही करण्यात आलं. या वादानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं.
रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा#आवाज_बहुजनांचा_सन्मान_महाराष्ट्राचा
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 5, 2023
'रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा.इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा,' असं आव्हाड त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं असता, ते आव्हाडांचं वैयक्तिक मत असल्याचं अजित पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.