जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुणे जिल्ह्यातील 'या' किल्ल्यावर सापडल्या 2 cannon, शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण

पुणे जिल्ह्यातील 'या' किल्ल्यावर सापडल्या 2 cannon, शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण

पुणे जिल्ह्यातील 'या' किल्ल्यावर सापडल्या 2 cannon, शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण

या तोफा (Cannon) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जुन्नर, 15 एप्रिल: जुन्नर तालुक्यातील किल्ले हडसर (Hadsar Fort) येथील कमानी टाक्यातला गाळ काढत किल्ले संवर्धन करणाऱ्या तरुणांना दोन तोफा आढळून आल्या आहेत. तसंच या तोफा (Cannon) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामुळे इतिहास प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण असून किल्ले हडसरचा इतिहास उलगडण्यात मदत होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन ग्रुप यांच्या मार्फत तालुक्यातील किल्ले हडसर गडावर संवर्धनाचं काम किल्ले संवर्धन संस्था शिवाजी ट्रेलच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यात गडाचा मुख्य दरवाजा, दुसरा दरवाजा पायरी मार्ग, धान्य कोठार तसंच माहिती फलक, दिशा दर्शक फलक, नव्याने तयार करण्यात आलेला गडाचा पूर्ण नकाशा, अशी कामे आतापर्यंत करण्यात आली असून 2021 पासून गडावरील मुख्य पाण्याचे स्रोत असणारे कमानी टाके ग्रुपकडून संपूर्ण गाळमुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. हेही वाचा - सरकारचा नवा आदेश, कडक लॉकडाऊनमध्ये आणखी 2 विभागांचा अत्यावश्यक सेवेत केला समावेश हे टाके 56 फूट लांब आणि 23 फूट रुंद व खोली 15 फूट असं प्रचंड मोठं असून यामधील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी गृपमधील सर्वजण संवर्धन करण्यासाठी योगदान देतात, तर इतर पाच दिवस निमगिरी गावातील स्थानिकांना कंपनीच्या वतीने रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून निमगिरीच्या ग्रामस्थांमार्फत हे कार्य चालू आहे. कारण गेली अनेक वर्षे या ग्रामस्थांनी किल्ले निमगिरीवर काम केले असल्याने त्यांना संवर्धन कसे करावे याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली होती व त्याच पध्दतीने ते ऐतिहासिक वारशास धोका न पोहोचता काम करत असल्याने किल्ले हडसरवर पण तेच काम करत आहेत. बुधवारी टाकीतील दक्षिणेकडून गाळ काढत असताना दोन तोफा कमानी टाक्यामध्ये आढळून आल्या व त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. एक तोफ सात फूट लांबीची व बॅरल चार इंच व्यास असून दुसरी तोफ सात फुट चार इंच लांब व बॅरल व्यास दोन इंच असून सुंदर मकरमुखाची ही तोफ पहावयास मिळत आहे. या तोफांमुळे किल्ले हडसरचा इतिहास अजून उलगडण्यात मदत होईल, असं मत शिवाजी ट्रेलचे विनायक खोत ,मेजर रमेश खरमाळे यांनी व्यक्त केलं. मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन ग्रुप यांच्या मार्फत या तोफांना लवकरच तोफगाडे बसवून त्यांना संरक्षित करण्यात येईल. यावेळी निमगिरी ग्रामस्थ अमोल ढोबळे, विनायक खोत आणि रमेश खरमाळे उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात