जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गोकुळ दूध संघाने केली दरवाढ; मुंबईत उद्यापासून दुधासाठी मोजावे लागणार इतके रुपये

गोकुळ दूध संघाने केली दरवाढ; मुंबईत उद्यापासून दुधासाठी मोजावे लागणार इतके रुपये

गोकुळ दूध संघाने केली दरवाढ; मुंबईत उद्यापासून दुधासाठी मोजावे लागणार इतके रुपये

दुसरीकडे, दूध खरेदी दरातही वाढ केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा काहीसा फायदा होणार आहे. सध्या म्हैशीच्या दूध खरेदीत दोन रुपयांची तर गाईच्या दुधाला प्रतिलिटर एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जुलै : एकीकडे महागाई सतत वाढत असताना आता दूध दरातही वाढ झाली आहे. प्रसिद्ध गोकुळ दूध संघाने विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून प्रतिलिटर दूध विक्री दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत म्हशीच्या 1 लिटर दुधासाठी 66 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढीव दराचा फटका बसणार आहे. दुसरीकडे, दूध खरेदी दरातही वाढ केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा काहीसा फायदा होणार आहे. सध्या म्हैशीच्या दूध खरेदीत दोन रुपयांची तर गाईच्या दुधाला प्रतिलिटर एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पशुखाद्य आणि इतर जनावरे सांभाळण्याचा खर्च जास्त वाढल्याच्या पार्श्वभूमीवर खरेदी दरात काहीशी वाढ करून दूध उत्पादकांना खूष करण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात