पणजी, 2 डिसेंबर : जगभरातील लोक भारतीय संस्कृतीकडे कायम आकर्षित होतात. परिणामी दरवर्षी लाखो विदेशी पर्यटक भारतात येतात. आपल्याकडे अतिथी देवो भव: म्हटलं जातं. मात्र, काही समाजकंटक आणि वाईट प्रवृत्तीचे लोक पर्यटकांशी गैरवर्तन करतात. मुंबईमध्ये अशीच एक घटना समोर आली. शहरातील रस्त्यावर एका दक्षिण कोरियातील युट्यूबर मुलीची छेड काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत झाला होता. ही घटना ताजी असतानाच गोव्यात आता एका विदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
गोवा राज्यात पर्यटनासाठी आलेल्या एका विदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिला रशियन असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे गोव्यात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर दुसरीकडे दोनतीन दिवसात देशात अशा दोन घटना घडल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलिन होत असल्याचीही टीका होत आहे.
वाचा - फिरायला नेण्याच्या बहाण्याने जंगलात नेलं अन्.. चारित्र्याच्या संशयातून प्रियकराचं धक्कादायक पाऊल
मुंबईतील छेडछाड प्रकणात दोघांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य नावाच्या युजरनं ट्विटरवर एका दक्षिण कोरियन युट्यूबर मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ती युट्यूब लाइव्ह करत असताना एका तरुणानं तिचा हात पकडून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. साधारण एक मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये ती तरुणी विरोध करत असतानाही एक व्यक्ती तिचा हात पकडून तिला गाडीवरून लिफ्ट देतो असं म्हणत असल्याचं दिसत आहे. तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे.
विशेष म्हणजे संबंधित तरुणी लाइव्ह स्ट्रिमिंग करत आहे. तिने अतिशय शांत राहून आणि प्रसंगावधान राखत त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. लाइव्ह स्ट्रीम संपवण्याचा प्रयत्न करून ती तिथून निघते. पण, तिची छेड काढणारा तरुण काही वेळातच बाईकवर असलेल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत तिच्या मागे येतो आणि पुन्हा लिफ्ट देऊ करतो. मोडक्या-तोडक्या इंग्रजीत तो तिला गाडीवर बसण्यास सांगतो. आपली गाडी जवळच पार्क केलेली आहे, असं उत्तर देऊन ती मुलगी तिथून निघण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सुमोटो तक्रार दाखल करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Goa