मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भीषण! क्वारंटाइन व्हावं लागेल या भीतीने 3 दिवस मुलींनी घरातच लपवला वडिलांचा मृतदेह; एकीने नैराश्यातून केली आत्महत्या

भीषण! क्वारंटाइन व्हावं लागेल या भीतीने 3 दिवस मुलींनी घरातच लपवला वडिलांचा मृतदेह; एकीने नैराश्यातून केली आत्महत्या

वडिलांचा मृत्यू झाल्याची (Death of a father) बाब इतरांना समजली तर कोरोना टेस्ट (Corona Test) आणि त्यानंतर क्वारंटाईन (quarantine) होण्याचं संकट उभं राहिलं, असा विचार करून तीन मुलींनी आपल्या वडिलांचा मृतदेह (Dead Body) घरातच ठेवला.

पुढे वाचा ...

पालघर, 6 ऑगस्ट : वडिलांचा मृत्यू झाल्याची (Death of a father) बाब इतरांना समजली तर कोरोना टेस्ट (Corona Test) आणि त्यानंतर क्वारंटाईन (quarantine) होण्याचं संकट उभं राहिलं, असा विचार करून तीन मुलींनी आपल्या वडिलांचा मृतदेह (Dead Body) तीन दिवस घरातच ठेवला. तो मृतदेह सडल्यानंतर त्याचा वास सुटू नये, यासाठी कापूर, अगरबत्या आणि परफ्युमचा त्यावर मारा केला. या घटनेच्या मानसिक दबावानुसार एका मुलीनं आत्महत्या (Suicide) केली, तर दुसऱ्या मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला.

नेमकं काय घडलं?

पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये सहरकर कुटुंब राहतं. त्यातील कुटुंबप्रमुख हरिदास सहरकर यांचा आजारपणामुळे घरीच मृत्यू झाला. मात्र वडिलांच्या मृत्यूची बातमी बाहेरच्यांना समजली, तर आपल्या सर्वांची कोरोना टेस्ट करावी लागेल, अशी भीती त्यांच्या तीन मुलींना वाटू लागली. कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली, तर क्वारंटाईन होण्याची वेळ येईल, असा विचारही त्यांना सतावू लागला. त्यातून त्यांनी वडिलांचा मृतदेह घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला. तीन दिवस हा मृतदेह घरात लपवून ठेवण्यात आला होता, अशी बातमी दैनिक भास्करने दिली आहे.

कुटुंबावर दबाव

या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती. कोरोना टेस्ट आणि क्वारंटाईन यांचा खर्च परवडणारा नसल्याच्या भीतीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. वडिलांचा मृतदेह घरातच ठेऊन त्यावर कापूर, उदबत्ती आणि परफ्युमचा मारा करून त्याचा वास सुटू नये, याची खबरदारी मुलींनी घेतली. मात्र वडिलांच्या मृत्यूचा धक्का आणि त्यानंतरचा हा दबाव सहन झाल्याने त्यांच्या मोठ्या मुलीने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला होता.

दुसऱ्या मुलीनेही समुद्रात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र किनाऱ्यावर उपस्थित असणाऱ्या काहीजणांनी तिला बाहेर काढत तिचा जीव वाचवला. या प्रकरणी पोलीस आत्महत्येच्या गुन्ह्याच्या तपासासंबंधी चौकशी करत असताना वडिलांच्या मृत्यूचा प्रकार समोर आला.

हे वाचा -पुणे : किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरून मृत्यू

आई मनोरुग्ण

या मुलींची लग्न झालेली नसून त्यांची आई मनोरुग्ण असल्याची बाब समोर आली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

First published:
top videos

    Tags: Home quarantine, Palghar, Suicide