मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणे : किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरून मृत्यू

पुणे : किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरून मृत्यू

मूळची दिल्लीची असलेली रुचिका शेठ ठाणे व डोंबिवलीतल्या मित्रांसोबत पर्यटनासाठी आली होती.

मूळची दिल्लीची असलेली रुचिका शेठ ठाणे व डोंबिवलीतल्या मित्रांसोबत पर्यटनासाठी आली होती.

मूळची दिल्लीची असलेली रुचिका शेठ ठाणे व डोंबिवलीतल्या मित्रांसोबत पर्यटनासाठी आली होती.

जुन्नर, 4 ऑगस्ट : कोरोनामुळे पर्यटनास बंदी असतानाही भर पावसात पावसाळी पर्यटनासाठी भटकंती करत असताना मित्रांसोबत किल्यावर गेलेल्या तरुणीच्या मृत्यूचं वृत्त समोर आलं आहे. जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक नाणेघाट जवळील जीवधन किल्ला पाहून खाली उतरत असताना दिल्ली येथील पर्यटक तरुणीचा पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी 4 ऑगस्ट रोजी घडली आहे. (Pune A young girl who went to the fort for tourism slipped and died)

जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील मृत तरुणीचे नाव रुचिका सेठ असून (वय ३०) ती दिल्ली येथे राहत होती. रुचिका 31 जुलै रोजी दिल्लीहून ठाणे येथील ओमकार बाईत यांचेकडे आली होती. ओमकार व रुचिका हे दोघे 3 ऑगस्ट रोजी मोटार सायकलवरून कल्याण येथे आले. यानंतर डोंबिवली पूर्व येथील दिनेश रामकरण यादव व मंजू दिनेश यादव यांच्या सोबत मोटारसायकल वरून चौघेही माळशेज घाट मार्गे नाणेघाट येथे आले. येथे त्यांनी रात्री मुक्काम केला. सकाळी चौघे जीवधन किल्ला पहाण्यासाठी गेले होते. किल्ला पाहून परत येत असताना ही दुर्घटना घडली. जखमी रुचिकास जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्या आधीच ती मृत झाली होती. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती मृत झाल्याचे जाहीर केले.

हे ही वाचा-ज्वेलर्सकडे चोरी करण्यासाठी तरुणांनी भांड्यांच्या दुकानातून काढला मार्ग

नाणेघाट व जीवधन किल्ले परिसरात पावसाळ्यात जोरदार पाऊस असतो. दाट धुके असते. प्रचंड सोसाट्याचा वारा असतो. याशिवाय शेवाळलेल्या वाटा असल्याने घसरून पडण्याच्या घटना घडतात. या किल्ल्यावरून घसरून पडल्याने जखमी झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र, मृत झाल्याची ही पहिलीच घटना आहे. पर्यटनास बंदी असताना देखिल नाणेघाट परिसरात पावसाळी पर्यटनास येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पोलिसांच्या दंडात्मक कारवाईची भीती बाळगली जात नाही. मागील आठवड्यात तर पोलिसांना अरेरावीची भाषा वापरून कारवाईत अडथळा आणल्याचा आरोपावरून पुणे येथील अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाची जोखीम घेऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक जाधव यांनी केले आहे.

First published: