जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अंशिकाला बुडताना पाहताच बाल्कनीत उभी असलेली निधी धावली; थोडा उशीर झाला असता तर...

अंशिकाला बुडताना पाहताच बाल्कनीत उभी असलेली निधी धावली; थोडा उशीर झाला असता तर...

अंशिकाला बुडताना पाहताच बाल्कनीत उभी असलेली निधी धावली; थोडा उशीर झाला असता तर...

निधीच्या एका निर्णयाने अंशिकाचा जीव वाचला.

  • -MIN READ Badlapur,Thane,Maharashtra
  • Last Updated :

बदलापूर, 17 एप्रिल : स्विमिंगपूलमध्ये बुडणाऱ्या एका तीन वर्षाच्या चिमुकलीला 18 वर्षाच्या तरुणीने वाचवल्याची घटना बदलापुरात घडली आहे. मोहन तुलसी विहार या गृह संकुलात बुधवारच्या सुमारास ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास इथल्या स्विमिंग पूल शेजारी खेळणारी अंशिका कुमार ही पाय घसरून स्विमिंग पुलच्या पाण्यात पडली. याचवेळी निधी उमरानिया ही आपल्या बाल्कनीत उभी होती. तिने हे पाहताच तात्काळ इमारतीच्या खाली येत स्विमिंग पुलमध्ये उडी घेतली. आणि तिने अंशिकाला पाण्याच्या बाहेर काढले. मात्र अचानक पाण्यात पडल्याने तीन वर्षांच्या अंशिकाच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने ती बेशुद्ध झाली होती. त्यानंतर निधीने त्या तीन वर्षाच्या चिमुकलीचे नाक दाबून तोंडात फुंकर मारली. काही वेळाने मुलीमध्ये हालचाली जाणवली आणि अशा प्रकारे तिचा जीव वाचला. त्यानंतर या मुलाला नजीकच्या खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आले. हे स्विमिंग पुल गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत होते. मात्र आता उन्हाळी सुट्टी लागल्याने स्विमिंग पूल सुरू करून त्यात पाणी भरण्यात आले होते. तिथे सुरक्षा रक्षक नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या दुर्घटनेनंतर स्विमिंग पूलच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमेल का? हे पहावे लागेल. दरम्यान निधीच्या धाडसामुळे चिमुकलीचे जीव वाचल्याने तिचे कौतुक केलं जात आहे. बीड आहे की बिहार? सलग 3 दिवसात तीन जणांचा खून, अंगावर शहारे आणणाऱ्या घटना नवसपूर्तीसाठी आले असताना धरणात बुडून मृत्यू दरम्यान दोन दिवसांपूर्वीच नाशिकमधून धक्कादायक घटना घडली आहे. नवसपूर्ती करण्यासाठी आलेल्या आईसोबत 7 महिन्याच्या चिमुकलीचा केंद्राइ धरणात बुडून मृत्यू झाला. अर्चना देवकर आणि तन्वी देवकर अशी या मायलेकीचे नाव आहे. ही घटना चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथे घडली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अर्चना देवकर आणि तन्वी देवकर अशी या मायलेकी इतर नातेवाईकांसोबत नवस फेडण्यासाठी आल्या होत्या. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून केंद्राई मातेच्या मंदिरात आल्या होत्या. यावेळी मंदिराला खेटून असलेल्या धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यूचीं नोंद करून तपास केला सुरू आहे. तर आई आणि चिमुरडीचा मृत्यू झाल्याच्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात