अहमदनगर, 10 ऑक्टोबर: ‘पंतप्रधान नरेंद मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावरून टीकाकारणारे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उंची वाढल्यासारखे वाटते. परंतु, शरद पवार यांच्या खांद्यावर बसून ते स्वतःची उंची मोजतात. तुम्ही शरद पवार यांच्या खांद्यावरून उतरा म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही किती खुजे आहे हे कळेल’ अशा शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. गोपीचंद पडळकर हे करमाळा येथून औरंगाबादच्या दिशेने आज सकाळी जात होते. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील अहमदनगर करमाळा महामार्गावरील पडलेल्या खाड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्या पडळकर यांनी मिरजगाव येथे आल्यानंतर तेथील लोकांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी खराब रस्त्यावर उभा राहून व्हिडीओ बनवला आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मा.@PawarSpeaks यांच्या खांद्यावर बसुन मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या @RRPSpeaks यांनी खांद्यावरून खाली मतदार संघात उतरावे व मतदार संघातील कामावर लक्ष द्यावे.मोदी साहेब व फडणवीस साहेबांना सल्ले देत बसू नये.@News18lokmat@abpmajhatv@TV9Marathi @news_lokshahi pic.twitter.com/299qq7RUpF
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) October 10, 2020
‘देशात आणि महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षांपासून नेतृत्व करणारे शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. मी आज औरंगाबादला दौऱ्यानिमित्त चाललो असताना त्यांच्या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. रोहित पवार रोज हे ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत असतात. त्यांना त्यांची उंची फार वाढल्या सारखी वाटते. पण त्यांना अजून माहिती नाही, शरद पवारांच्या खांद्यावर बसून ते त्यांची उंची मोजतात’, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ‘रोहित पवार तुम्ही शरद पवार यांच्या खांद्यावरून खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात, हे तुम्हाला कळेल. मिरजगावमधील गावातील साधा रस्ता तुम्हाला करता येत नाही. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वांना तुम्ही सल्ले देत असाल, तर हे सल्ले देण्यापेक्षा कर्जत मतदारसंघातील हे रस्ते दुरुस्त करा. राज्यामध्ये तुमचे सरकार आहे. येत्या काही दिवसात कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्ते तुम्ही लवकरात-लवकर दुरुस्त करावे आणि मग बाकीच्यांना सल्ले द्यावे’, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.