मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाड MIDC मधील केमिकल कंपनीमध्ये वायू गळती, एका कामगाराचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीर

महाड MIDC मधील केमिकल कंपनीमध्ये वायू गळती, एका कामगाराचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीर

वायुगळतीच्या दुर्घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवर मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mahad, India

महाड, 15 नोव्हेंबर : महाड एमआयडीसीमधील प्रसोल कंपनीमध्ये सोमवारी रात्री वायुगळती झाल्याची घटना घडली. या वायुगळतीमध्ये एक कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघांना वायूची लागण झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. जखमी कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा प्रसोल कंपनीमध्ये वायुगळतीची घटना घडली. या वायू गळतीमुळे एका कामगाराचा जागीच मृ्त्यू झाला. जितेंद्र आडे (वय वर्ष 40 राहणार वाळण बौद्धवाडी) असे मृत कामगारचे नाव आहे तर प्रशांत किंकले आणि मिलिंद मोरे हे गंभीर असीन त्याच्यावर महाडमधील देशमुख नर्सिंग होम येथे उपचार सुरी आहेत.

वायुगळतीच्या दुर्घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवर मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. मृत आणि गंभीर कामगारांना न्याय द्या तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केली जात आहे. या दुर्घटनेप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक संदेश महागावकर यांच्याशी संपर्क केला असता कोणतीच वायूची गळती झाली याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितलं.

दुर्घटनास्थळी पोलीस पोहोचले असून रात्री उशिरापर्यंत या दुर्घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती.

First published:

Tags: Marathi news