संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात आजही हनुमान टेकडी परिसरात गणपती आणि मोहोरमच्या ताझिया एकाच मंडपात विराजमान झाले आहेत. राम-रहीम मित्र मंडळानं पुन्हा एकदा यंदाच्या गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम एकोप्याचं दर्शन घडवलं आहे. राम-रहीम मित्र मंडळ गेल्या 42 वर्षांपासून हिंदू- मुस्लिम बांधवांच्या एकोप्याचे दर्शन घडवत आहे. विशेष म्हणजे येथे गणपती बाप्पाची आरती मुस्लिम बांधव करतात. यंदातर मोहोरम ताझिया आणि गणपतीची एकाच मंडपात स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी हिंदू-मुस्लिम बांधव दोन्हीही सण एकत्र मनोभाने साजरा करत आहेत. राम-रहीम मित्र मंडळानं एकाच मंडपात गणपती आणि दहा फुटाच्या अंतरावर ताझिया स्थापन केल्या आहे.