मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गावाकडचे गणपती : नवसाला पावणारा नांदेड जिल्ह्यातला सत्य गणपती

गावाकडचे गणपती : नवसाला पावणारा नांदेड जिल्ह्यातला सत्य गणपती

अर्धापूर तालुक्यातील दाभड या गावात सत्य गणपतीचं मंदीर आहे. नवसाला पावणारा गणपती अशी सत्य गणपतीची ओळख आहे.

अर्धापूर तालुक्यातील दाभड या गावात सत्य गणपतीचं मंदीर आहे. नवसाला पावणारा गणपती अशी सत्य गणपतीची ओळख आहे.

अर्धापूर तालुक्यातील दाभड या गावात सत्य गणपतीचं मंदीर आहे. नवसाला पावणारा गणपती अशी सत्य गणपतीची ओळख आहे.

    नांदेड, 12 सप्टेंबर : जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातील दाभड या गावात सत्य गणपतीचं मंदीर आहे. प्रत्येक देवस्थानची एक वेगळी कथा असते तशी ती सत्य गणपतीची सुद्धा आहे. मराठवाडयातील जाग्रुत देवस्थान, नवसाला पावणारा गणपती अशी सत्य गणपतीची ओळख आहे. सत्य गणपती मंदीरात भविकांची नेहमी गर्दी असते. अनेक वर्षांपूर्वी गावाजवळच्या एका पिंपळाच्या झाडाखाली गणपतीची एक दगडाची स्वयंभु मुर्ती होती. पिंपळाखालच्या या गणपतीची गावकरी पुजा करीत असत. त्याकाळात अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांतील भावीक दाभड येथे दर्शानासाठी येत असे. हळू-हळू या सत्य गणपती ख्याती पंचक्रोशीत पसरली. पिंपळाच्या झाडाखालील दगडाच्या स्वयंभु मुर्तीच्या दर्शनासाठी भावीकांची गर्दी वाढत गेली. 1993 साली त्याच पिंपळाखाली हे सत्य गणपतीचे मंदीर उभारण्यात आले. जुन्याच स्वयंभू गणेश मुर्तीला पाषाण चढवून या मुर्तीची मंदीरात प्रतिष्ठापणा करण्यात आली. या मंदीराच्या मागच्या बाजुला पिंपळाखाली आजही एक दगडाची गणेश मुर्ती आहे. मुख्य मुर्तीचे दर्शन घेउन नंतर झाडाखालच्या मुर्तीची पुजा अर्चा केली जाते असल्याचे मंदिराचे पुजारी बाळक्रुष्ण बन सांगतात. ज्या पिंपळाच्या झाडाखाली मुर्ती आहे, त्या पिंपळाच एक वैशिष्ट म्हणजे या झाडाच्या एकाच फांदीला दोन वेग-वेगळी पानं येतात. एक पान पिंपळाचं आणी त्या बाजुलाच वडाचे पान असते. पिंपळाच्या पानाला देठ असतं, तर वडासारख्या पानाला देठ नसतो. हा सत्य गणपतीचा चमत्कार असल्याची श्रद्धा आहे. सुरुवातीला सत्य गणपतीच्या दर्शनासाठी नांदेड आणी आपसपासच्या जिल्ह्यातील भावीक यायचे. आता सत्य गणपतीची ख्याती दुरवर पसरली आहे. मराठवाड्यासह विदर्भ आणी तेलंगणातून रोज असंख्य भावीक येथे दर्शनासाठी येतात. सत्य गणपती संकट दुर करणारा आणी नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे. गणेश चतुर्थीला ईथे पन्नास ते साठ हजार भवीकांची गर्दी असते. पहाटे पासून ते रात्री उशीरापर्यंत सत्य गणपतीच्या दर्शनासाठी रांगा लावतात. अनवानी पायाने भावीक पायी येउन दर्शन घेतात. VIDEO - गणेशोत्सव विशेष : गणपतीच्या डोक्यावर चंद्र कसा आला?
    First published:

    Tags: Nanded, नांदेड

    पुढील बातम्या