ठाणे 18 सप्टेंबर : पोहण्यासाठी गेल्यावर योग्य खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं असतं. अनेकदा पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत असतात. नुकतंच भिवंडीमधून अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात बारावीमध्ये शिकणाऱ्या एका कॉलेजच्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. अमित गुप्ता असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. औरंगाबादेत अपहरण नाट्याचा थरार, 4 कोटींच्या खंडणीसाठी निवृत्त अधिकाऱ्याचं सिनेस्टाईल अपहरण भिवंडी शहरातील बीएनएन कॉलेजमध्ये 12 वीत शिकणारे चार विद्यार्थी अजंठा कंपाऊंड येथील विहिरीमध्ये पोहाण्यासाठी गेले होते. पोहत असताना अमित गुप्ता हा विद्यार्थी बराच वेळ झाला तरी वरती आलाच नाही. यानंतर त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करून मदत मागण्याऐवजी तिथून पळ काढला. हे विद्यार्थी कोणालाही न सांगता घरी निघून गेले. सगळे घरी परतले मात्र अमित बराच वेळ घरी आला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तो सापडलाच नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी तपास केला असता तो अजंठा कंपाउंड इथल्या विहिरीत पोहण्यासाठी गेलेला असताना बुडाला असल्याचं समजलं. 6 वर्षाच्या मुलीसह महिलेची टेरेसवरुन उडी घेत आत्महत्या; पती म्हणाला ‘3 दिवसांपासून बोलत होती हे एकच वाक्य’ यानंतर अग्निशामक दलाला माहिती देताच जवान आणि स्थानिक तरुणांनी एका तासाने अमितचा मृतदेह बाहेर काढला. घटनेनंतर 24 तासानंतर अजंठा कंपाउंड येथील विहिरीतून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यामुळे पावसामध्ये विहीरीत, नदीत पोहण्यास जाणं मुलांनी टाळावं तसंच उघड्या विहिरींना जाळी बसवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.