जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लग्नावरुन परतताना पावसामुळे झाडाच्या आडोशाला थांबले अन्.. एकाच क्षणात चौघांचं कुटुंब संपलं

लग्नावरुन परतताना पावसामुळे झाडाच्या आडोशाला थांबले अन्.. एकाच क्षणात चौघांचं कुटुंब संपलं

हृदयद्रावक घटना

हृदयद्रावक घटना

गडचिरोली जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

गडचिरोली, 24 एप्रिल : मागील दोन आठवड्यात अवकाळी पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात थैमान घातलं. यात शेतमालाच्या नुकसानासह जीवितहानीही झाली. अशीच एक हृदयद्रावक घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यात लग्नाला गेलेले कुटुंब घरी परतत असताना मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबले असताना वीज पडली. त्यात आई-वडील आणि दोन मुलीसह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण कुटुंबच मृत्युमुखी पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील भारत राजगडे आपली पत्नी आणि दोन लहान मुलींसह कुरखेडा येथे नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. लग्न समारंभ आटपून परतत असताना तुळशीपाट्याजवळ मुसळधार पाऊस सुरू झाला. त्या पावसापासून बचाव करण्यासाठी चौघेही एका झाडाखाली थांबले. दुर्दैवाने त्या झाडावर वीज पडली आणि त्यात त्या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेले दोन दिवस सातत्याने अवकाळी पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असून एकाच वेळी चौघांचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अवकाळी पावसाचं संकट कायम राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून तयार झालेले अवकाळी पावसाचे वातावरण पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचं चित्र आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यातही विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची स्थिती जैसे थे राहणार असून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोमवारपासून पुन्हा एकदा मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. वाचा - 69 वर्षीय महिलेला प्लॅन करून संपवलं, कामवालीबाईची एक चूक झाली आणि… अवकाळी पावसाने यंदा राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचे ढग कधी दूर होणार, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अक्षय्य तृतीया झाल्यानंतर राज्यातील वातावरण निवळेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात होता. मात्र आता हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या ताज्या माहितीनुसार, पुढील आठवड्यातही राज्यातील विविध भागांत पाऊस कोसळू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात