पिंपरी चिंचवड, 02 फेब्रुवारी : शिवसेनेचे (shivsena) माजी खासदार गजानन बाबर (gajanan babar) यांचं निधन झालं आहे. ते 80 वर्षांचे होते. बाबर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पिंपरी चिचंवडमधील ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. गजानन बाबर यांना काही महिन्यांपूर्वी कॅन्सर झाला होता आणि त्यातच दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडत गेली. त्यामुळे त्यांना चिचंवडमधील ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी ११ वाजता निगडी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. गजानन बाबर हे मुळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी होते. 1990 साली वाई मतदारसंघातून त्यांनी विधानसभा लढवली होती. त्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये राजकारणाला सुरुवात केली. कट्टर शिवसैनिक म्हणून बाबर पुढे आले. पिंपरी चिंचवडमध्ये काळभोरनगरमध्ये शिवसेनेची पहिली शाखा त्यांनीच सुरू केली होती. त्यानंतर काळभोर यांना पराभूत करत बाबर यांनी शिवसेनेचा भगवा फडकावला होता. गजानन बाबर यांनी ३ वेळा नगरसेवकपद भुषावले होते. तर हवेली मतदारसंघातून २ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहोते. पण २००४ मध्ये राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी बाबर यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 दरम्यान मावळ लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते. पण, 2014 च्या निवडणुकीत सेनेनं त्यांचं तिकीट कापलं होतं. त्यामुळे बाबर नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. पण मनसेत फार काळ रमले नाही. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ गेले होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेशही केला होता. पण, 2019 मध्ये त्यांची पुन्हा घरवापसी झाली होती. शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला होता. सेनेत असताना नगरसेवक, आमदारकी आणि खासदारकीही भुषवली. त्यांच्या निधनामुळे शिवसैनिकांनी दु:ख व्यक्त केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.