मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

‘प्रायश्चित्त म्हणून राज्यपालांनी राजीनामा द्यावा’, शिवसेनेच्या माजी मंत्र्यांनी केली मागणी

‘प्रायश्चित्त म्हणून राज्यपालांनी राजीनामा द्यावा’, शिवसेनेच्या माजी मंत्र्यांनी केली मागणी

'राज्यपाल महोदयांनी प्रायश्चित्त म्हणून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांना एक क्षणही त्या पदावर राहण्याचा काहीच अधिकार नाही'

जालना 18 ऑक्टोबर:  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. खोतकर म्हणाले, जेव्हा त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणतात की त्यांचं चुकलं, तर मग राज्यपाल महोदयांनी प्रायश्चित्त म्हणून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांना एक क्षणही त्या पदावर राहण्याचा काहीच अधिकार नाही असा खोचक सल्ला ही खोतकर यांनी दिलाय. न्यूज18'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत अमित शहा म्हणाले की, राज्यपालांचं पत्र मी वाचलं आहे. त्यांनी योग्य शब्दांची निवड केली असती तर बरं झालं असतं. असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्रात (Maharastra) मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं होतं. 'तुम्ही कधीपासून सेक्युलर झालात?' असा सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना केला होता. अमित शहा यांच्या या भूमिकेचं शिवसेना खासदार संजय राऊत स्वागत केलं आहे. एवढंच नाही तर त्यांचे आभारही मानले आहेत. संजय राऊत म्हणाले, 'राज्यपाल पत्राबाबत अमित शहांची भूमिका योग्यच आहे. आम्ही या वादावर आता पडदा टाकला आहे. अमित शहांचं वक्तव्य राजकीय अर्थानं नाही आहे. मी त्यांना ओळखतो ते सत्य भूमिका मांडतात.' मात्र, सुशांतसिंह प्रकरणाचं राजकारण राज्यातील भाजप नेत्यांनी केलं. जेडीयूच्या नेत्यांनी त्याचा बिहारच्या निवडणुकीत मुद्दा केला. सीबीआय दोन महिने झालं तपास करतंय त्याचं काय झालं? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ड्रग्जचा विषय फक्त बॉलीवूडचा नसून त्याचा संबंध संपूर्ण जगाशी आहे, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Shivsena

पुढील बातम्या