जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 13 लोकांचा जीव घेणारा 'राक्षस' अखेर जाळ्यात अडकलाच, नरभक्षी सीटी 1 वाघ जेरबंद

13 लोकांचा जीव घेणारा 'राक्षस' अखेर जाळ्यात अडकलाच, नरभक्षी सीटी 1 वाघ जेरबंद

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

भंडारा जिल्हासह गडचिरोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यात 13 लोकांची शिकार करण्याऱ्या नरभक्षी सीटी 1 वाघाला गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे जेरबंद करण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भंडारा 13 ऑक्टोबर : गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या सीटी 1 या नरभक्षी वाघामुळे वनविभागाची चांगलीच दमछाक उडाली होती. गेल्या 3 महिन्यांपासून ताडोबातील विशेष पथक या वाघाला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होतं. मात्र, यात यश येत नव्हतं. आता अखेर या वाघाला जेरबंद करण्यात यश आलं आहे. झुडपात दडून बसलेल्या वाघाचा गाईवर हल्ला, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील LIVE VIDEO भंडारा जिल्हासह गडचिरोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यात 13 लोकांची शिकार करण्याऱ्या नरभक्षी सीटी 1 वाघाला गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे जेरबंद करण्यात आलं आहे. या नरभक्षी वाघामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. त्यामुळे वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी नागरिक करत होते. वनविभागाकडूनही यासाठी प्रचंड प्रयत्न सुरू होते. आता अखेर या प्रयत्नांना यश आलं आहे. आज सकाळी झालेल्या या कारवाईने वनविभागासह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या वाघाने देसाईगंज जवळच्या एका गाईवर दोन दिवसांपूर्वी हल्ला केला होता. त्यामुळे वाघ तिथे पुन्हा येणार अशी खात्री असल्याने वनविभागाची ताडोबा येथून बोलावण्यात आलेली टीम त्याच्यावर पाळत ठेवून होती. वाघाला तिथे बोलावण्यासाठी जवळच शिकार म्हणून दुसरी एक गायही ठेवली होती. शेतातील झाडाखाली उभा राहिली महिला; क्षणभरात अंगावर कोसळला मृत्यू, कधीही करू नका ही चूक आज सकाळी हा नरभक्षी वाघ त्या सापळ्यात अडकला. यानंतर वाघ तिथे येताच शूटर टीमने त्याच्यावर बेशुद्धीचे इंजेक्शन डागलं. या नरभक्षी वाघाला आता पिंजऱ्यात बंद करून ठेवलं जाणार आहे. मात्र, नरभक्षी वाघाला पकडण्यात अखेर यश आल्याने परिसरात आणि आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांनी आता सुटकेचा श्वास सोडला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात