प्रमोद पाटील (नवी मुंबई), 04 एप्रिल : मुंबईमध्ये वन विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे काही लोक अलंकार बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शंखांची तस्करी करून जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत करोडो रुपयांची तस्करी असल्याचे बोलले जात आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वन अधिकाऱ्यांना गुप्त माहितीच्या आधारे काही लोक वाहनातून कॅपिझ शंख (शेल्स)ची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्याच अनुषंगाने पेण, पनवेलमधील मुंबई, गोवा महामार्गावर रायगड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संशयित वाहनाचा पाठलाग केला.
Nashik News : वाईननंतर नाशिक होणार बिअर कॅपिटल! 2 मित्रांनी एकत्र येत उभारला कारखाना! पाहा Videoयावेळी पोलिसांनी रस्त्यात अडवून संशयीत वाहन चालकाला विचारणा केली. मात्र वाहन चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला, लगेचच त्यांनी वाहनांची तपासणी सुरू केली. त्यात त्यांना भरलेल्या गोणी आढळल्या, त्या गोणी उघडून बघितल्यावर त्यात हे शंख असल्याचे दिसून आले.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही वाहने आणि दोन जणांना ताब्यात घेऊन अधिक माहिती करिता त्यांची चौकशी सुरू केली आहे. माल कुठून आणला आणि कुठे घेऊन जाणार होते याबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे. या कारवाईतील मिळालेल्या शाखांची किंमत बाजारात करोडो रुपयांचा घरात असल्याचे बोलले जात आहे. तर या तस्करीमध्ये आणखी कुणी सामील आहे का, याचाही तपास आणि चौकशी सुरू असून, याबाबत लवकरच खुलासा होणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या शंखा पासून शोभेच्या अनेक वस्तू बनविल्या जातात. नाटकनेक्ट फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार या शंखा पासून झुमर, टेबलटॉप्स, कॉलॅसिबल, स्क्रीन,फर्निचर,लॅम्पशेड्स, कटलरी,आणि दागिने यासारख्या सजावटीच्या अनेक वस्तूंची निर्मिती होते.यांची बाजारात किंमत दहा हजार ते पाच लाखांपर्यंत असू शकते,यामध्ये झुमरची किंमत पाच लाख आणि फॉल्डॆबल पार्टीशन स्क्रीनची किंमत चार लाख आसण्याची शक्यता आहे.त्यामुळे अत्यंत महागड्या अशा शंखा ची तस्करी उघडकीस आली आहे.
या कारवाईत सहाय्यक वन संरक्षक संजय वाघमोडे,वन परिक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे,उरण,कुलदीप पाटकर,पेण आणि ज्ञानेश्वर सोनवणे,पनवेल यांचा मुख्य सहभाग होता.या सर्वांनी हे फिल्मी स्टाईलने केलेले ऑपरेशन यशस्वी केले.त्यामुळे ही करोडोंची वस्तूंची तस्करी उघडकीस आली.