पंढरपूर, 06 डिसेंबर : हल्ली सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करण्याचा भलताच छंद लोकांना जडला आहे. पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे राज्य सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा रील तयार करण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी चक्क पंढपूरच्या विठ्ठल मंदिरातच व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओ वाद पेटण्याची चिन्ह आहे.
('साहेबांच्या पाठीवरील वळ पाहून सगळेच हळहळले,' सुप्रिया सुळेंची बेळगाव लढ्याबद्दल पोस्ट)
दोन दिवसांपूर्वी मुरलीधर मोहोळ हे पंढपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. पण यावेळी त्यांनी एक व्हिडीओ तयार केला होता. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फोटो आणि व्हिडीओ काढण्यास मनाई आहे.
#पंढरपूर - भाजपचे राज्य सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचे विठ्ठल मंदिरात फोटोसेशन pic.twitter.com/J1ineQq6od
— News18Lokmat (@News18lokmat) December 6, 2022
असं असतानाही मोहोळ यांनी व्हिडीओ तयार केला. याआधीही पुण्याचे गोल्डमॅन यांनीही असाच व्हिडीओ काढला होता. त्यानंतर आता पुण्याच्या माजी महापौर मोहोळ यांनी हे कृत्य केले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
(महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर कोर्टातून मोठी बातमी, शिवसेनेची मागणी फेटाळली)
मंदिरात फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीला बंदी असताना सुद्धा मोहोळ यांनी फोटोसेशन केलं. असंख्य पदाधिकारी घेऊन श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात काढलेले व्हिडिओ समोर आला आहे. व्हीआयपी कल्चर सांभाळण्यासाठी कॉरिडोअर करणार का? असा सवाल पंढरपूरकरांनी केला आहे. या प्रकरणी आता मंदिर प्रशासन काय कारवाई करणार याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news