ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Share this:

गडचिरोली, 13 जून : ट्रक आणि कारची धडक होऊन गडचिरोलीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघातात इतका भयंकर होता की कारचा चक्काचूर झाला आहे.

अहेरीवरुन चंदारपुरला उपचारासाठी जाणाऱ्या कारला लगाम गावाजवळ ट्रकने धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर गंभीर जखमी अवस्थेत दोघांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात झाल्यानंतर कारमध्ये अडकून पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली. कारण ट्रकच्या धडकेमुळे कारच्या पुढच्या बाजूचं मोठं नुकसान झालं होतं. दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

राज्यातील अपघातांमध्ये मोठी वाढ

लॉकडाऊनच्या काळात रस्ते ओस पडल्यानंतर अपघातांमध्ये घट झाली होती. मात्र लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता आणताच पुन्हा एकदा अपघाताचं सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नगरमध्येही भीषण अपघात

अहमदनगर मनमाड महामार्गावर राहाता शहराजवळ दोन मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात राजस्थान येथील ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे, तर क्लिनर जखमी झाला आहे. राहाता शहराजवळ महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकला राजस्थानकडे जाणाऱ्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की उभा असलेला ट्रक थेट डिव्हायडरवर चढला आणी धडक देणाऱ्या ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 13, 2020, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading