मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाडमधील पूरस्थिती गंभीर; 10 हजारहून अधिक नागरिक पुराच्या विळख्यात

महाडमधील पूरस्थिती गंभीर; 10 हजारहून अधिक नागरिक पुराच्या विळख्यात

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीला महापूर (Flood in Mahad) आला आहे. अतिमुसळधार पावसामुळे आलेल्या या महापुरामुळे संपूर्ण महाड शहर पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे.

रायगड 23 जुलै : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हाहाकार घातला आहे. कोकणात (Heavy rain in Konkan) गुरुवारी रात्रीपासूनच अनेक गावांसोबतचा संपर्क तुटल्याची माहिती समोर येत आहे. अशात रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीला महापूर (Flood in Mahad) आला आहे. अतिमुसळधार पावसामुळे आलेल्या या महापुरामुळे संपूर्ण महाड शहर पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. शहरातील तब्बल 10 हजारहून अधिक नागरिक महापुराच्या पाण्यानं वेढले गेल्याची माहिती समोर आली आहे.

मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा तसंच खंडीत झाला असून नागरिकांसोबतचा संपर्कही तुटला आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी NDRF आणि SDRF नं शुक्रवारी पहाटेपासूनच रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. महाड शहराच्या उत्तरेला सावित्री नदीच्या महापुराचं पाणी तब्बल 10 किलोमीटरपर्यंत पसरलं आहे.

पुणे भिमाशंकर मंदिराला पाण्याचा वेढा; इतिहासात पहिल्यांदाच शिवलिंग पाण्यात

महापुराच्या तडाख्यात सापडलेल्या गावांनाही पुराची मगरमिठी बसली आहे. सावित्री नदीच्या उत्तरेला NDRF च्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. नागरिकांना महापुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी पहाटेपासूनच प्रयत्न सुरू झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आता रौद्ररूप धारण केल्याचं पहायला मिळत आहे. कोकणात (Heavy rain in Konkan) परिस्थिती चिंताजनक झाली असून अनेक शहरांत पाणी शिरले आहे. चिपळूण शहरात (Chiplun City) पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातली सर्व दुकाने, तसेच घरांत पाणी (rain water in houses) शिरल्याचं पहायला मिळत आहे.

First published:

Tags: Raigad, Rain fall, Rain flood