मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आधी पंतप्रधान आणि उद्धव ठाकरेंनी लस घ्यावी, त्यानंतरच मी लस घेईल -आंबेडकर

आधी पंतप्रधान आणि उद्धव ठाकरेंनी लस घ्यावी, त्यानंतरच मी लस घेईल -आंबेडकर

' दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून शाहीन बागसारखे किसान बाग आंदोलन येत्या 27 जानेवारी रोजी राज्यभर करण्यात येणार आहे'

' दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून शाहीन बागसारखे किसान बाग आंदोलन येत्या 27 जानेवारी रोजी राज्यभर करण्यात येणार आहे'

' दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून शाहीन बागसारखे किसान बाग आंदोलन येत्या 27 जानेवारी रोजी राज्यभर करण्यात येणार आहे'

औरंगाबाद, 16 जानेवारी : देशभरात कोरोनावर  (coronavirus vaccine) मात करण्यासाठी कोव्हिडशील्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सीन (covaxin) या दोन लशी देण्यात येत आहे. पण, जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi)आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी ही लस आधी घ्यावी, त्यानंतर मी लस घेईल, असा पवित्रा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी घेतला.

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद शहरात आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी 'केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायदे विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शाहीन बाग सारखे किसान बाग आंदोलन येत्या 27 जानेवारी रोजी राज्यभर करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

कोरोनाची लस आपण घेणार आहात का? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'आधी केंद्रात पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घ्यावी त्यानंतर मी लस घेईल' अशी भूमिकाच आंबेडकर यांनी मांडली.

तसंच, औरंगाबादच्या नामकरणावरून सुरू असलेल्या वादाबाबत त्यांनी औरंगाबादकर जनतेचं मतदान घ्यावे, अशी मागणी केली. 'समाजातील गरीब मराठा समाज, जोपर्यंत बंड करणार नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही', असे देखील आंबेडकर म्हणाले.

केंद्राच्या सूचनेनुसार राज्यात कोरोना लस मोफत - मुख्यमंत्री

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील बीकेसी येथील जम्बो लसीकरण केंद्रात राज्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत पहिल्या कोविड योद्धा व्यक्तीला लस देण्यात आली. यावेळी मुंबईत कोविड 19 संक्रमण काळात संसर्ग झालेल्या रुग्णांची स्वत: चा जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या आरोग्य सेवकांना पहिल्यांदा कोविशिल्ड लस टोचण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, 'केंद्र सरकारकडून कोविड लसीकरणाबाबत महत्त्वाच्या सूचना मिळाल्या आहे. त्यानुसार कोरोना काळात लढा देणाऱ्या योद्ध्यांना सर्वात आधी लस देण्याचे ठरले आहे. नाहीतर राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मीच पहिली लस टोचून घेतली असती. केंद्र सरकारकडून अद्याप लस मोफत देण्याबाबत कोणतीही सूचना आली नाही. लशीची किंमत किती असेल याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. केंद्राने याबद्दल भूमिका स्पष्ट केली तर राज्यात आम्ही पुढचा निर्णय घेऊ' असं स्पष्ट केले.

First published:
top videos