राजापूर, 13 सप्टेंबर : उद्योगमंत्री उदय सामंत यांना मारण्याची धमकी देणाऱ्या रिफायनरी विरोधी समितीचे सरचिटणीस नरेंद्र जोशी यांना झालेल्या मारहाणप्रकरणी रिफायनरी विरोधी संघटनेने आंदोलान पुकारलं होतं. या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि अन्य तीन संशयित व्यक्तींविरोधात FIR दाखल करून घेण्यात आली आहे. तब्बल बारा तास आंदोलन करणाऱ्यांसमोर पोलीस प्रशासनाला अखेर झुकावं लागलं. महामार्गावर तरुणाच्या दुचाकीने घेतला पेट; दृश्य पाहून मुख्यमंत्री भरपावसात गाडीतून उतरले अन्…, VIDEO नरेंद्र जोशी यांना न्यायालयाच्या आवारात मारहाण करण्यात आली होती. तसेच चिरा डोक्यात मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मारहाण करताना मारेकऱ्यांनी आम्ही उदय सामंत यांची माणसे आहोत असं सांगितलं असल्याचा आरोप नरेंद्र जोशी यांनी केला. त्यामुळे उदय सामंत यांनाही या प्रकरणात गोवण्यात आलं. मारहाण झालेले नरेंद्र जोशी यांची पोलिसांकडून मेडिकल टेस्टही करण्यात आली होती. या मारहाणीचा निषेध म्हणून राजापूर पोलीस स्टेशनमध्ये ठीया आंदोलन करण्यात आलं होतं. ॲडिशनल एस पी जयश्री देसाई यांनी आंदोलकांना आश्वासन दिले की या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, मग ते उदय सामंत असो किंवा अन्य कोणी, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. हे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी रात्री बारा वाजता आपलं आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. ‘महाराष्ट्राला हवे 2 मुख्यमंत्री, एक मंडळात जातील दुसरे..’, सुप्रिया सुळेंचा निशाणा नरेंद्र जोशींनी केली न्यायाची मागणी - माझ्याकडून चुकीचं वक्तव्य झालं, त्याबद्दल मी सोशल मीडियावर दिलगिरी व्यक्त केली होती. तरीदेखील न्यायालयाच्या आवारात माझ्यावर जो जीवघेणा हल्ला झाला तो उदय सामंत यांच्या गुंडांनी केला. त्यावेळेला तिथे आलेल्या गुंडांनी माझ्या डोक्यात चिरा घालण्याचा प्रयत्न केला. नशीब चांगले होते म्हणून मी वाचलो. तसंच माझ्यावर ज्या गुंडांनी हल्ला केला आहे, त्यांना तात्काळ अटक होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनीही या विषयात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा. यापुढेही उदय सामंत यांच्या गुंडांकडून मला आणि माझ्या सहकाऱ्यांना धोका आहे. पोलिसांनी याची वेळेत दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी नरेंद्र जोशी यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.