मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ना महिला पाहिल्या ना वृद्ध, जमिनीच्या वादातून तुफान मारामारी, नाशिकमधला LIVE VIDEO

ना महिला पाहिल्या ना वृद्ध, जमिनीच्या वादातून तुफान मारामारी, नाशिकमधला LIVE VIDEO

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर फाटा परिसरात ही घटना घडली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर फाटा परिसरात ही घटना घडली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर फाटा परिसरात ही घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून दोन गटामध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता.

नाशिक, 07 जानेवारी :  रक्ताची नाती ही सर्वात जवळची नाती. पण, पैसा आणि जमिनीचा तुकड्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठलेली माणसं नाशिकमध्ये (nashik) पाहण्यास मिळाली. जमिनीच्या वादावरून (land dispute case) दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. यात महिला आणि वृद्धांना बेदम मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर फाटा परिसरात ही घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून दोन गटामध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. आज या वादातून दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर तुफान हाणामारीत झाले.

यावेळी काही तरुणांनी महिला आणि वृद्धांना हॉकी स्टिक, लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. महिलांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करण्यात आले. तर एका तरुणाने हॉकी स्टिकने वयोवृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली. जखमी झालेल्या महिला याचना करत होत्या, पण या तरुणांनी मारहाण सुरूच ठेवली. घरात घुसून मारहाण करण्याचा प्रयत्नही या तरुणांनी केला.

(VIDEO - 'जादुई' ब्लँकेट! हातात पडताच व्हिलचेअरवरील दिव्यांग व्यक्तीही चालू लागली)

ही संपूर्ण घटना यात घरातील मुलाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत वयोवृद्ध इसमासह माहिलांना जबर मार लागला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

First published:
top videos