मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तुफान राडा, शिवसेना-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फोडली एकमेकांची डोकी, LIVE VIDEO

तुफान राडा, शिवसेना-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फोडली एकमेकांची डोकी, LIVE VIDEO

भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत असताना सोनाळे गावात काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला.

भिवंडी, 16 जानेवारी : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (gram panchayat election 2021) शांततेत मतदान पार पडले. परंतु, भिवंडीमध्ये सत्ताधारी असलेल्या शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसचे (Congress) कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भर रस्त्यावर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत असताना सोनाळे गावात काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लाठ्या काठ्याने एकमेकांवर हल्ला चढवला. एवढंच नाहीतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

काँग्रेसचे नेते विजय पाटील आणि शिवसेनेचे नेते सुनील हरड, कैलास पाटील यांच्यामध्ये मतदानावरून वाद झाला होता. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. काही वेळांनी दोन्ही गटांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली. रॉड, लाठ्या काठ्याने एकमेकांवर हल्ला चढवला.  या घटनेमध्ये पाच जण जखमी झाले  होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना गावात मात्र काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांची डोकी फोडताना समोर आले आहे.

First published:

Tags: Gram panchayat