मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तापाने फणफणत असलेल्या लेकासाठी बापाने पुरातून काढला रस्ता, LIVE VIDEO

तापाने फणफणत असलेल्या लेकासाठी बापाने पुरातून काढला रस्ता, LIVE VIDEO

गावात नीट आरोग्य सुविधा नाही. त्यात नदी, नाल्यांना पूर आला अशातच आजारी मुलाला खांद्यावर घेत बापाने पुरात पाय ठेवला.

गावात नीट आरोग्य सुविधा नाही. त्यात नदी, नाल्यांना पूर आला अशातच आजारी मुलाला खांद्यावर घेत बापाने पुरात पाय ठेवला.

गावात नीट आरोग्य सुविधा नाही. त्यात नदी, नाल्यांना पूर आला अशातच आजारी मुलाला खांद्यावर घेत बापाने पुरात पाय ठेवला.

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 14 जुलै : राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहत आहे. पुराच्या पाण्यात जाऊ नका असं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. पण, मुलगा तापाने फणफणत असल्यामुळे बापाने जीवाची बाजी लावून पुराच्या पाण्यात जाऊन नदी पार केली आणि तसाच परतही आला. चंद्रपूरमधील घटनेचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

तापाने फणफणत असलेल्या चिमुकल्या पोराला घेऊन बाप पुरात शिरला आणि उपचार करून पुन्हा दिव्य पार करत परतला. गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील रहिवासी असलेल्या श्यामराव पत्रूजी गिनघरे यांच्यावर ही वेळ आली मात्र बाप यातही धीराने उभा राहिला. गावात नीट आरोग्य सुविधा नाही. त्यात नदी, नाल्यांना पूर आला अशातच आजारी मुलाला खांद्यावर घेत बापाने पुरात पाय ठेवला. पुरातून पायी मार्ग काढीत मुलावर उपचार करण्यासाठी दुसऱ्या गावाला घेऊन गेला.

चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवसापासून मुसळधार पाऊस सूरू आहे. यामुळे वर्धा, वैनगंगा नदीला पूर आला. महाराष्ट्राच्या शेवटचा टोकावर असलेले पोडसा हे गाव वर्धा नदीचा काठावर वसले आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे गावाला बेटाचं स्वरूप आलं आहे. गावातील श्यामराव पत्रूजी गिनघरे यांच्या मुलगा कार्तिक याला ताप आला. तो तापाने फणफणत होता. गावात आरोग्य सुविधा नाही. दुसरीकडे दुसऱ्या गावाला जाणारे मार्ग पुराने वेढलेले.

(प्रताप सरनाईकांनी शिवसेनेलाच लावला सुरुंग, 18 नगरसेवक घेऊन शिंदे गटात दाखल)

पोडसा गावापासून पाच ते सहा कि.मी.अंतरावर वेडगाव गाव आहे. येथे खाजगी डॉक्टर आहेत. मुलाला खांद्यावर वर घेऊन भर पुरातून श्यामराव मार्ग काढीत गेला. मुलावर उपचार केला आणि परत पुरातून मार्ग काढीत गावाकडे गेला. डोंगरावढे संकट मात्र बाप हिमालयाएवढा भासला.

First published:
top videos