इम्तियाज अहमद, प्रतिनिधी जळगाव, 14 फेब्रुवारी : प्रत्येक पित्यासाठी आपल्या मुलीचे लग्न हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि प्रत्येक पितासुद्धा आपल्या आपल्या मुलीचे लग्न चांगल्या प्रकारे लावण्यासाठी प्रयत्नशील असतो. तो या क्षणाची वाट पाहत असतो. मात्र, काहीवेळा काळ अचानक घाला घालतो आणि होत्याचं नव्हतं होतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच वधु पित्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. हृदयविकाराने मृत्यू या वधुपित्याचा मृत्यू झाला. जामनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गावात ही हृदयद्रावक घटना घडली. लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच वधु पित्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या मांडवे बुद्रुक गावात घडली आहे. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ केली जात आहे. अरुण कासम तडवी, असे वधू पित्याचे नाव आहे. आपल्या मुलीच्या विवाह निमित्त हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने वधू पित्याचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा - प्रेमीयुगुलांनी साधला मुहूर्त, जळगावात 12 ते 15 जोडप्यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ला बांधली रेशीमगाठ
अमरावतीमध्ये शेतकऱ्यांची तब्बल 50 लाखांनी फसवणूक -
कापूस खरेदीत तब्बल 50 लाखांनी फसवणूक झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमरावतीमध्ये 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापसाला अधिक भाव देण्याची बतावणी करून तीन व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची तब्बल 50 लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये धारणी तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी धारणी पोलिसांनी 12 फेब्रुवारी रोजी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद मोहसीन (वय-20), अर्जुन सानू पटोरकर (वय-25) व मोईन खान वसीम खान अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.