मुंबई, 15 जुलै : गेल्या काही दिवसांत टोमॅटोचे दर वाढत चालले आहेत. टोमॅटो दर वाढल्यानंतर बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. शेतकरी नेत्यांनीही सुनील शेट्टीला यावरून सुनावले आहे. आजकाल मी टोमॅटो कमीच खातो, लोकांना वाटते की मी सुपरस्टार असल्यानं या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होणार नाही. पण हे खोटे आहे. आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते असं सुनील शेट्टी म्हणाला होता. टोमॅटोचे भाव वाढल्याने अभिनेता सुनील शेट्टी यांनी जागतिक विषय केलाय. सुनील शेट्टी यांनी टोमॅटोचे भाव वाढल्याने त्यांच्या पत्नीचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. जर भाव वाढले असतील तर सुनील शेट्टी यांनी टोमॅटो खाऊ नये, शेट्टी काही मरणार नाही, मात्र शेतकऱ्यांची टिंगल टवाळी करू नये अशा शब्दात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अभिनेता सुनील शेट्टी ला खडसावले. Health Tips : हे आजार असलेल्या लोकांनी अजिबात खाऊ नये टोमॅटो, ठरू शकतं जीवघेणं! दोन चार वर्षात एखादाच महिना असा येतो की टोमॅटो किंवा कांद्याचे भाव वाढतात. त्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात. इतर वेळी भाजीपाला रस्त्यावर फेकून द्यावा लागतो. मात्र शहरी भागातील लोक हे त्यांचे भांडवल करतात. त्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते, अशा शब्दात रविकांत तुपकर यांनी अभिनेता सुनील शेट्टीला सुनावले. सुनील शेट्टीच्या या विधानानंतर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देताना सुनील शेट्टीला जागतिक भिकारी म्हटलं. सुनील अण्णा शेट्टी जर कटोरा घेऊन दारी आला तर टमाटू वाढ ग माई अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी सुनील शेट्टीवर टीका केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.