मुंबई, 15 जुलै : सध्या देशात सर्वत्र टोमॅटोचीच चर्चा सुरु आहे. कारण एरव्ही 30 ते 40 रुपये किलो मिळणाऱ्या टोमॅटोचे दर 100 रुपये प्रति किलोच्या वर पोहोचले आहेत. टोमॅटो खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. परंतु काही लोकांसाठी ते जिवघेणे देखील ठरू शखते. आयुर्वेदानुसार 5 प्रकारच्या समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही टोमॅटो खाऊ नये. अन्यथा तुम्हाला आजारी पडू शकता आणि मृत्यूचा धोकाही निर्माण होऊ शकतो. कोणत्या लोकांनी टॉमॅटो खाणे टाळावे? मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होत असल्यास ज्या महिलांना मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होण्याची समस्या आहे, त्यांनी देखील टोमॅटो खाणे टाळावे. याशिवाय असा त्रास असलेल्या महिलांनी टोमॅटोसह, टॉमॅटो सूप आणि टोमॅटो सॉसही खाणे टाळावे. कारण अशा स्थितीत टॉमॅटो खाल्ल्याने शरीरात पित्त दोष वाढतो, त्यामुळे रक्तस्राव वाढू शकतो. त्वचेची अॅलर्जीअसलेल्यांनी खाणे टाळावे तुम्हाला त्वचेची अॅलर्जी किंवा शरीरावर खाज येण्याची समस्या असेल तर टोमॅटो खाणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्वचेची अॅलर्जी असल्यास टोमॅटो, बटाटे, वांगी, आंबट फळे, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शरीरात पित्तदोष वाढतो आणि शरीरावर लाल पुरळ उठून खाज सुटते. अॅसिडिटीची समस्या असलेल्यांनी खाणे टाळावे गॅस-अॅसिडिटी किंवा अल्सरचा त्रास असलेल्यांनीही लाल टोमॅटो खाणे टाळावे. कारण टोमॅटो खाल्ल्याने शरीरातील पचनक्रिया मंदावते, त्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि आंबट ढेकर येण्यासह छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवते. किडनी स्टोनचे रुग्णांनी टोमॅटो खाऊ नये किडनी स्टोनची समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही टोमॅटो खाऊ नये. कारण टोमॅटोमध्ये कॅल्शियम ऑक्सलेट नावाचे घटक आढळतात. त्यामुळे किडनीमध्ये खडे तयार होऊ लागतात. याच्या बिया देखील पोटात लवकर पचत नाहीत. त्या मूत्रपिंडात जाऊन गोठू शकतात. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या वाढू शकते. सांधेदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी खाणे टाळावे आयुर्वेदाच्या तज्ज्ञांच्या मते ज्या लोकांना सांधेदुखीची समस्या आहे किंवा ज्यांना अनेकदा शरिरावर सूज येते, त्यांनी टोमॅटो खाणे टाळावे. याशिवाय गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास असलेल्यांनीही टोमॅटो खाणे टाळावे. अशा लोकांनी कच्चा टोमॅटो चुकूनही खाऊ नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.