Home /News /maharashtra /

सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपुरातल्या शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपुरातल्या शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर (Pandharpur) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपुरातील शेतकऱ्याने विष घेत आत्महत्येचा प्रयत्न (Farmer Attempt to Suicide) केला आहे.

पंढरपूर, 15 मे : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर (Pandharpur) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपुरातील शेतकऱ्याने विष घेत आत्महत्येचा प्रयत्न (Farmer Attempt to Suicide) केला आहे. तर या घटनेचा व्हिडिओही व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. मागील काही दिवसापूर्वी पंढरपूर तालुक्यातील एका तरूण शेतकऱ्यांने कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. असे असतानाच, सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपूर जवळच्या वाखरी येथील परमेश्वर ‌पोरे या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषारी औषध घेऊन आत्महत्या करत असल्याचा लाईव्ह व्हीडिओ समाज माध्यमात व्हायरला झाला आहे. या घटनेने पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आमच्याकडे आहे. मात्र, तो जास्त विचलित करणारा असल्याने तो दाखवता येत नाही. त्यामुळे इतकाच दाखवत आहोत. शेतकऱ्याच्या पोटी पुन्हा जन्माला येणार नाही. सरकार शेतकऱ्यासाठी काहीही करत नाही. असे म्हणत वैफल्यग्रस्त झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते. त्यानंतर आता सावकाराने परस्पर शेत विकल्याच्या कारणाने परमेश्वर पोरे या शेतकऱ्याने विषारी औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. विषारी औषध प्राशन घेत आत्महत्या करत असतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:News18 Desk
First published:

Tags: Farmer, Pandharpur news, Person suicide

पुढील बातम्या