मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या, 'त्या' विधानावरून अखेर गुन्हा दाखल

इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या, 'त्या' विधानावरून अखेर गुन्हा दाखल

इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

अहमदनगर, 26 जून : प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनात 'स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' असं वक्तव्य केलं होतं. इंदुरीकरांच्या किर्तनाचा व्हिडिओ 'मराठी कीर्तन व्हिडिओ' या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केल्या होत्या.

या विधानावरून इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चं हे उल्लंघन असल्याचा आरोप करत अहमदनगर इथल्या PCPNDT च्या सलागर समितीच्या सदस्यानि त्यांना नोटीस पाठवली होती. यावर इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांन मार्फत बाजू मंडली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांची नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल अशी नोटीस दिली होती.

महाराष्ट्रातील शहीद वीरपुत्रांवरून शिवसेनेची भाजपवर जहरी टीका, म्हणाले...

त्यामुळे अखेर 19 जूनला संगमनेर इथल्या वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांनी कोर्टात गुन्हा दाखल केला. खरंतर इंदुरीकरांच्या या विधानामुळे वाद चांगला तापला होता. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या विधानावरून सुरू असलेला वाद थांबता थांबेना, असंच चित्र होतं. यात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यादेखील आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी आपल्या वकिलामार्फत इंदुरीकर महाराजांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.

'वादग्रस्त विधानाप्रकरणी 10 दिवसांमध्ये माफी मागा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ,' असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त केला होता. मात्र तृप्ती देसाई यांनी इंदुरकीर यांच्याकडे माफी मागण्याचीच मागणी केली होती.

चहातल्या साखरेमुळं संपवला आयुष्याचा गोडवा, पतीने पत्नीची गळा चिरून केली हत्या

नेमकं इंदुरीकर महाराज काय बोलले होते?

'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला,'असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केल्याचं एका व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.

शरद पवार घेणार पुण्याचा आढावा, फडणवीसांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता

संपादन - रेणुका धायबर

First published:

Tags: Indurikar maharaj, Indurikar maharaj video