मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

चहातल्या साखरेमुळं संपवला आयुष्याचा गोडवा, पतीने पत्नीची गळा चिरून केली हत्या

चहातल्या साखरेमुळं संपवला आयुष्याचा गोडवा, पतीने पत्नीची गळा चिरून केली हत्या

चहावरुन या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर रागाच्या भरात 40 वर्षीय पतीने 35 वर्षीय पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

चहावरुन या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर रागाच्या भरात 40 वर्षीय पतीने 35 वर्षीय पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

चहावरुन या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर रागाच्या भरात 40 वर्षीय पतीने 35 वर्षीय पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

लखीमपूर (उत्तर प्रदेश), 26 जून : देशात लॉकडाऊन असताना हत्येचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. असाच एक भयानक प्रकार समोर आला आहे. एका इसमाने आपल्या पत्नीचा गाळा चिरुन खून केला आहे. चहावरुन या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर रागाच्या भरात 40 वर्षीय पतीने 35 वर्षीय पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीने सकाळी साडेपाच वाजता दिलेल्या चहामध्ये साखरेचं प्रमाण नेहमीपेक्षा कमी होतं. म्हणून संतापलेल्या पतीनं तिचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील बारबीरमध्ये ही घटना सोमवारी घडली जेव्हा बायकोने दिलेल्या चहामध्ये साखर कमी असल्यामुळे पती बबलू कुमार रागाने चौताळून उठला. त्याने तिच्याशी वाद घातला आणि पत्नी रेणू (वय 35) हीला मारहाण केली. त्याचा राग ऐवढ्यावरच शांत नाही झाला तर नंतर त्याने धारदार शस्त्राने तिचा गळा कापला.

महाराष्ट्रातील शहीद वीरपुत्रांवरून शिवसेनेची भाजपवर जहरी टीका, म्हणाले...

आपल्याच वडिलांनी आईला अश्या निर्घृणपद्धतीने मारताना पाहिल्यानंतर तीन मुलं धावत आली. पण ते आईकडे जाईपर्यंत ती रक्ताच्या थारोळ्यात स्वयंपाकघरात थडफडत होती. अखेर तिने आपल्या मुलांदेखत अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, बबलूने 12 वर्षांपूर्वी रेणूशी लग्न केलं होतं. या जोडप्याला तीन मुलं झाली.

या सगळ्या घटनेनंतर रेणूचे वडील बद्री प्रसाद यांच्या तक्रारीवरून बबलूविरोधात आयपीसीच्या कलम 302 (खून) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटना झाल्यानंतर आरोपी पतीने तेथून पळ काढला. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत असून आरोपीला पकडण्यासाठी परिसरात छापेमारी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सलग 20 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर

संपादन - रेणुका धायबर

First published:

Tags: Murder case