राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 19 फेब्रुवारी : राज्य सरकारकडून (Maharashtra Government) कुटुंब नियोजन (family planning) किटमध्ये रबरी लिंग देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पण सरकारच्या या निर्णयावर आशा वर्कर (Asha Worker) नाराज असल्याचं चित्र आहे. राज्य सरकारकडून कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग देण्यात आलं आहे. पण यामुळे आशा वर्कर समोर अजब समस्या आहे. कारण रबरी लिंग प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी समाविष्ट करण्यात आलं आहे. आता ते घेऊन गावात फिरायचे कसे? राज्य सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. राज्यात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असतात. त्यामध्ये राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कुटुंब नियोजनाचा उपक्रमही राबवण्यात येत असतो. मात्र सरकारने या कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये आशा वर्कर्सना रबरी लिंग देऊन पेचात पाडलं आहे. प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे रबरी लिंग आशा वर्कर्सना देण्यात आले असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांकडून ऑफ कॅमेरा सांगण्यात आलं आहे. ( IPL 2022 : मुंबई इंडियन्सने केली मोठी चूक, विराटच्या कोचने सांगितली ) मात्र हे रबरी लिंग घेऊन ग्रामीण भागातील महिलांसमोर जायचं कसं? या विवंचनेत आशा वर्कर्स असल्याचं पाहायला मिळत आहे. आम्ही काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन सरकार विरोधात बोलायला साफ नकार दिला. त्यामुळे तोंड दाबून बुक्यांचा मार, या आशा वर्कर्स सहन करत आहेत. या संपूर्ण प्रकरणी काही आशा वर्कर महिलांना संताप व्यक्त करावासा वाटतोय. मात्र विषय संवेदनशील आणि तितकाच खाजगी असल्याने कॅमेऱ्यासमोर येऊन कोणीही बोलायला तयार नाही. विशेष म्हणजे या प्रकरणात समाजसेविका डॉ तबस्सूम हुसेन यांनी आक्षेप नोंदविला असून ही बाब लज्जस्पद असल्याचं बोललं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.