जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लक्ष्मीपूजनासाठीचं साहित्य, घराबाहेर दागिने, चिठ्ठी अन् मायलेकीचा पंख्याला लटकलेला मृतदेह; अमरावतीत खळबळ

लक्ष्मीपूजनासाठीचं साहित्य, घराबाहेर दागिने, चिठ्ठी अन् मायलेकीचा पंख्याला लटकलेला मृतदेह; अमरावतीत खळबळ

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अभियंता मुलगी आणि तिच्या आईचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत घरात आढळून आला. प्रथमदर्शी ही आत्महत्या असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घरात मृतदेहांजवळच एक चिठ्ठीही सापडली आहे.

  • -MIN READ Amravati,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती 26 ऑक्टोबर : अमरावतीमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती शहरातील आशियाड कॉलनीत अभियंता मुलगी आणि तिच्या आईचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत घरात आढळून आला. प्रथमदर्शी ही आत्महत्या असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घरात मृतदेहांजवळच एक चिठ्ठीही सापडली आहे. लग्नापासूनच छळ, नंतर म्हणाला संन्यास घ्यायचाय घटस्फोट दे; सोलापुरात महिलेसोबत धक्कादायक प्रकार सुवर्णा प्रदीप वानखडे वय 51 वर्ष आणि मृणाल प्रदीप वानखडे वय 25 वर्षे असं मृत आई आणि मुलीचं नाव आहे. घरात मृतदेहाजवळच पोलिसांनी एक चिठ्ठी सापडली आहे. ही चिठ्ठी इंग्रजीत लिहिलेली आहे. मात्र या चिठ्ठीमध्ये आत्महत्येबाबतचा कोणताही मजकूर लिहिला नसल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. घराबाहेरील मंदिराजवळ सोन्याचे दागिने आणि रोकड सापडली असल्याने आणखीच संशय बळावला आहे. या घरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही घटना घडली असं निदर्शनास येत आहे. कारण या ठिकाणी पूजेची सर्व तयारी झाल्याचं दिसून आलं. सध्या गाडगे नगर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पत्नी माहेरी गेल्याचं शेजाऱ्यांना सांगायचा; एका महिन्याने झाला हादरवणारा खुलासा, घरामागे दिसलं भयानक दृश्य सोलापुरात महिलेसोबत धक्कादायक प्रकार - सोलापूर जिल्ह्यातूनही एक धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली होती. मला संन्यास घ्यायचा आहे, तू लवकर घटस्फोट दे, असे म्हणत पत्नीला वारंवार मानसिक त्रास देत मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. आरोपी पतीने पत्नीला क्लिनिक टाकण्यासाठी माहेरून पैसे आण म्हणत मारहाण केल्याचीही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्मिता सदानंद मोरे (वय 32, रा. चंदननगर, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: amravati
  • First Published :
जाहिरात
जाहिरात