मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'काँग्रेस पक्षाची नाराजी', नितीन राऊतांचं नाना पटोलेंच्या 'त्या' वक्तव्याला समर्थन

'काँग्रेस पक्षाची नाराजी', नितीन राऊतांचं नाना पटोलेंच्या 'त्या' वक्तव्याला समर्थन

 "नाना पटोले आमचे प्रांताध्यक्ष आहेत. ते जर बोलले असतील तर त्यात निश्चितच काहीतरी सत्यता असेल. त्यामुळे त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांनी जे भाष्य केलं ते खरं असू शकतं", असं नितीन राऊत म्हणाले.

"नाना पटोले आमचे प्रांताध्यक्ष आहेत. ते जर बोलले असतील तर त्यात निश्चितच काहीतरी सत्यता असेल. त्यामुळे त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांनी जे भाष्य केलं ते खरं असू शकतं", असं नितीन राऊत म्हणाले.

"नाना पटोले आमचे प्रांताध्यक्ष आहेत. ते जर बोलले असतील तर त्यात निश्चितच काहीतरी सत्यता असेल. त्यामुळे त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांनी जे भाष्य केलं ते खरं असू शकतं", असं नितीन राऊत म्हणाले.

जळगाव, 13 मे : गोंदिया जिल्हा परिषदेच्या (Gondia Zilla Parishad) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी संताप व्यक्त केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) काँग्रेसच्या (Congress) पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप नाना पटोलेंनी केला. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी समाचार घेतला होता. त्यानंतर काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी नाना पटोलेंची भूमिका योग्य असल्याचं मत मांडलं. "नाना पटोले आमचे प्रांताध्यक्ष आहेत. ते जर बोलले असतील तर त्यात निश्चितच काहीतरी सत्यता असेल. त्यामुळे त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांनी जे भाष्य केलं ते खरं असू शकतं", असं नितीन राऊत म्हणाले.

नितीन राऊत आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान जामनेर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नाना पटोलेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. "राजकारणात एकजण बोलतो आणि दुसरा त्यावर प्रतिक्रिया देतो. यामध्ये गुंतून जाण्यापेक्षा बेरोजगारी आणि महागाईवर का बोलत नाही? काँग्रेस पक्षाची नाराजी व्यक्त करण्याची भावना प्रांताध्यक्षांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने मी त्याबद्दल सन्मानच करणार", अशी भूमिका नितीन राऊत यांनी मांडली.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले होते?

"भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. ही दगाबाजी आहे. तसेच याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे ठरवले होते. 30 जानेवारी 2022 रोजी याबाबतचे पत्र तीनही पक्षांनी काढले होते. त्यावर माझ्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेकडून सुभाष देसाई यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे मी जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी सातत्याने संपर्क साधला. राष्ट्रवादीने आम्हाला शेवटपर्यंत ताटकळत ठेवले. ऐनवेळी भाजपसोबत जाऊन पंचायत समित्यांमध्ये आणि गोंदिया जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली", असं नाना पटोले म्हणाले होते.

अजित पवारांचं नाना पटोलेंना उत्तर

नाना पटोलेंच्या या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं होतं. "काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक वक्तव्य केलं की, आमच्या पाठीत खंजीर खुपसला. वास्तविक नाना पटोले यांचं ते वक्तव्य हास्यास्पद वाटतं. कारण नानाच यापूर्वी कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले हे तुम्हाला माहिती आहे. मग आता भाजपने म्हणायचं का की, आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ते तिकडे गेले. हे तेवढ्या पुरतं हेडलाईन मिळवण्यापूरता पाठीत खंजीर खुपसला वगैरे वाक्य कदाचित त्यांना बरं वाटत असेल. पण संघटनेत प्रत्येक पक्ष आपआपल्या परीने काम करत असतो. आपलं महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आहे", असं अजित पवार म्हणाले होते.

"यापूर्वीही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र काम करत होतं. पण राज्यस्तरावर, देशस्तरावर निर्णय घेताना राज्यपातळीवरचे, देशपातळीवरचे नेते निर्णय घेतात. तिथली राजकीय परिस्थिती, तिथलं वातावरण पाहून सर्वच राजकीय पक्ष निर्णय घेतात. काँग्रेसने सुद्धा काही ठिकाणी तालुका, जिल्हास्तरावर भाजपसोबत हातमिळवणी केली. मी त्याला फार महत्त्व देऊ इच्चित नाही. जबाबदार व्यक्तींनी वक्तव्य करत असताना आपस्या वक्तव्याचा कुठंकाही वेडावाकडा अर्थ निघून वेडावाकडा परिणाम होणार नाही याबाबतही काळजी घेणं आवश्यक आहे", असं अजित पवारांनी बजावलं.

First published: