जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महावितरण अधिकाऱ्याला धमकावणं महागात पडणार? बबनराव लोणीकरांविरुद्ध कारवाईचे ऊर्जामंत्र्यांनी दिले आदेश

महावितरण अधिकाऱ्याला धमकावणं महागात पडणार? बबनराव लोणीकरांविरुद्ध कारवाईचे ऊर्जामंत्र्यांनी दिले आदेश

महावितरण अधिकाऱ्याला धमकावणं भाजप आमदाराला महागात पडणार? ठाकरे सरकारने दिले 'हे' आदेश

महावितरण अधिकाऱ्याला धमकावणं भाजप आमदाराला महागात पडणार? ठाकरे सरकारने दिले 'हे' आदेश

Maharashtra: शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणे आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मार्च : राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर (BJP MLA Babanrao Lonikar) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip viral) झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार बबनराव लोणीकर हे महावितरणच्या इंजिनिअरला शिवीगाळ करुन धमकावत आहेत. याप्रकरणाची ऊर्जामंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. ऊर्जामंत्र्यांनी या प्रकरणात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणे आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. “ज्या अधिकाऱ्याला अशी धमकी मिळाली त्यांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल. या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश मी औरंगाबाद येथील महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत,” असे ही ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) म्हणाले. वाचा :  वीज कापल्याने भाजप आमदाराचा संताप, वीज कर्मचाऱ्याला इन्कम टॅक्स रेडची धमकी, Audio Clip Viral आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या ध्वनीफितीबद्दलच्या बातम्यांची मी दखल घेतली आहे. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात अभियंत्यांसोबत केलेला संवाद हा धक्कादायक आहे. या ध्वनिफितीतील संवाद आणि भाषा अतिशय आक्षेपार्ह आहे. राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद भुषविलेल्या एका ज्येष्ठ राजकीय नेत्याला ही भाषा नक्कीच शोभणारी नाही. स्वतःला संस्कारी म्हणवणा-या एका पक्षाचे ३० वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या नेत्याच्या भाषेने या पक्षाच्या संस्काराचाही बुरखा या निमित्ताने फाटला आहे," असा टोलाही नितीन राऊत यांनी लगावला. लोणीकर यांच्या आरोपांबाबत वस्तुस्थिती दोन मीटरचे वर्षभरात 10 लाख बिल भरले असे लोणीकर म्हणत असले तरी गेल्या सव्वा वर्षांपासून त्यांनी विजेचे बिल भरले नाही. वाचा :  इंजिनिअरला धमकावल्याची क्लिप व्हायरल होताच आमदार बबनराव लोणीकरांनी दिलं हे स्पष्टीकरण 1. ग्राहक क्रमांक- 490014889105 श्री. राहूल बबनराव यादव हाऊस नं. 52, गट नंबर 146, आलोक नगर, औरंगाबाद पीन कोड- 430001 वीज बिल भरल्याची अखेरची तारीख- 18 जानेवारी 2021 मार्च 22 अखेर एकूण थकबाकी- 3 लाख 21 हजार 470 सद्यस्थिती- वीज जोडणी खंडित केलेली नसून वीज पुरवठा अद्यापही सुरू आहे. 2. ग्राहक क्रमांक- 490011009236 नाव- आय.एस. पाटील पत्ता- प्लॉट नं. 55, गट नं. 146, अशोकनगर जवळ, सातारा, औरंगाबाद पिन कोड- 431001 वीज बिल भरल्याची अखेरची तारीख- 27 मार्च 2019 मार्च 22 अखेर एकूण थकबाकी- 67 हजार 200 रूपये. सद्यस्थिती- वीज बिल थकल्याने वीज पुरवठा तात्पूरता खंडित केला आहे. लोणीकर हे 10 लाख वीज बिल भरल्याचे सांगत असले तरी त्यांच्या दोन्ही घरांची थकबाकी जवळपास 4 लाख आहे असं महावितरण कडून सांगण्यात आलं आहे. लोणीकर यांनी महावितरणच्या अधिका-यांना निलंबित करण्याची धमकी देणे हा शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा व शासकीय अधिका-यांवर चुकीच्या कामांसाठी दबाव टाकण्याचा प्रकार आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना सातत्याने इनकम टॅक्स आणि ईडी यांच्या धाडी टाकण्याची धमकी भाजप नेते देत असतात. आता ही धमकी अधिका-यांनाही देण्यापर्यंतची पातळी या नेत्यांनी गाठली हे अतिशय धक्कादायक व वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला हे शोभणारे नाही. त्याबद्दल लोणीकर यांनी महाराष्ट्राची व महावितरणच्या अधिका-यांची माफी मागायला हवी. दलित वस्त्यांबाबत त्यांनी केलेले वक्तव्यही आक्षेपार्ह आहे. यावरून त्यांची दलित समाजाबद्दलची मानसिकता दिसून येते, अशी टीका ही डॉ. नितीन राऊत यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात