• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • मोठी बातमी ! राज्यातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जाहीर

मोठी बातमी ! राज्यातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जाहीर

राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या जवळपास 7 हजार सदस्यपदांच्या रिक्त जागांसाच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 नोव्हेंबर : महाराष्ट्र निवडणूक आयोगाने एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यू. पी. एस. मदान यांनी अधिकृतपणे याबाबतची माहिती जारी केली आहे. "राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे", अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं. हेही वाचा : ST कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने महाराष्ट्र हादरला; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

  पोटनिवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम

  राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी 7 डिसेंबर 2021 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. त्यानंतर मतदान हे 21 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 पर्यंतच असेल. या सर्व ठिकणी 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल.
  Published by:Chetan Patil
  First published: