जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; राज्यपालांना पत्र पाठवत केली ही मागणी

मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; राज्यपालांना पत्र पाठवत केली ही मागणी

मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; राज्यपालांना पत्र पाठवत केली ही मागणी

मुख्यमंत्री शिंदे (CM eknath shinde) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवलं आहे. यात त्यांनी विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाठवलेली यादी मागे घेण्याची विनंती केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 03 सप्टेंबर : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासोबतच शिवसेनेला मोठा धक्काही बसला. कारण शिवसेनेच्या अनेक आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. यानंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्योरोपाची मालिका रंगली. यादरम्यानच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवलं आहे. यात त्यांनी विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाठवलेली यादी मागे घेण्याची विनंती केली आहे. शिंदे गट आणि भाजपकडून राज्यपालांना याजागी नवी यादी दिली जाणार आहे. Balasaheb Thorat : अशोक चव्हाण- देवेंद्र फडणवीस भेटीवर बाळासाहेब थोरातांनी एका वाक्यातच सांगितलं सत्य ‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही मागणी मान्य करुन ती यादी मागेही घेतली आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडीतील पक्षांसाठी धक्का मानला जात आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदार कोण असणार हे आता शिंदे गट आणि भाजप यांचं सरकार ठरवणार आहे. दरम्यान राज्याप नियुक्त 12 आमदारांसाठी भाजप आणि शिंदे गटामध्येही रस्सीखेच पाहायला मिळू शकते. या 12 जागांपैकी भाजपच्या वाट्याला किती आणि शिंदे गटाच्या वाट्याला किती जागा येतात, हे पाहाणंही महत्त्वाचं ठरणार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितच पुण्यात नियम धाब्यावर; पोलीसही म्हणाले ‘नो कमेंट्स’ महाविकास आघाडीने दोनदा पाठवलेली यादी - महाविकास आघाडीने सरकारने आपल्या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये दोनदा राज्यपालांकडे नावांची यादी पाठवली होती. मात्र राज्यपालांनी यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नव्हता. तांत्रिक बाबी किंवा कायदेशीर बाबी दाखवत राज्यपालांनी ही यादी मान्य केली नव्हती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात