मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'...म्हणून भोसरी भूखंड प्रकरणाची पुन्हा सुनावणी', एकनाथ खडसेंचा भाजपवर निशाणा

'...म्हणून भोसरी भूखंड प्रकरणाची पुन्हा सुनावणी', एकनाथ खडसेंचा भाजपवर निशाणा

नाथाभाऊंना गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात

नाथाभाऊंना गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात

नाथाभाऊंना गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी

जळगाव, 23 ऑक्टोबर : भोसरी भूखंड प्रकरणी पुन्हा चौकशी म्हणजे कुठे ना कुठे नाथाभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाथाभाऊंना गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसें यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

भोसरी भूखंड प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशीचे आदेश काढण्यात आले आहे. या प्रकरणावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

आतापर्यंत चार ते पाच प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न सुदैवाने न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिल्यामुळे आज मी बाहेर आहे. पण भोसरी भूखंड प्रकरणी पुन्हा चौकशी म्हणजे कुठे ना कुठे नाथाभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला असून नाथाभाऊंना गुन्ह्यांमध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात असा निशानाही एकनाथ खडसेंनी विरोधकांवर साधला आहे.

(Anil Parab Sai Resort : अनिल परबांना मोठा धक्का, साई रिसॉर्ट पाडण्याची वृत्तपत्रात आली जाहिरात!)

अँटी करप्शनकडून पूर्णपणे चौकशी होऊन याचा क्लोजर रिपोर्ट दोन वर्षांपूर्वी न्यायालयात सादर करण्यात आला. आता मात्र राज्य सरकारने आपल्याच तपासणी अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत पुन्हा चौकशी अहवाल सादर केला असून यामध्ये कुठलेही तथ्य नसून आपण यात निर्दोष असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

(काल अमित शहांना शुभेच्छा, आज उद्धव ठाकरेंसोबत नार्वेकर असणार दौऱ्यावर, नाराजीची चर्चा गेली वाहून!)

तसंच, महाराष्ट्रात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन खरीप पिके शेतकऱ्यांच्या हातात आलेली नाही अशा स्थितीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून शेतकऱ्यांची टिंगल उडवली जात असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कृषिमंत्री अब्दुल सत्तार करत असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकतर शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर करा अन्यथा शेतकऱ्यांची टिंगल तरी करू नका, असे खडेबोलही एकनाथ खडसे यांनी कृषिमंत्र्यांना सुनावले आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi news